अनधिकृत बोअरवेल खोद्ल्याने पालिकेच्या पाणी पुरवठा करणार्या टनेलला छिद्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2015

अनधिकृत बोअरवेल खोद्ल्याने पालिकेच्या पाणी पुरवठा करणार्या टनेलला छिद्र


सोसायटी आणि पालिका अधिकार्यावर कारवाई करण्याचे आदेश
मुंबई / अजेयकुमार जाधव / 8 Oct 2015
अंधेरी जोगेश्वरी येथील फरहाद सोसायटीने अनधिकृत बोअरवेल खोदताना मुंबईला पाणी पुरवठा करानार्या टनेलला छिद्र पाडण्यात आले आहे. यामुले अंधेरी आणि जोगेश्वरी पश्चिम येथील पाणी पुरवठ्या वर गेले 15 दिवस परिणाम झाला आहे. या प्रकरणी सोसायटी व् पालिकेच्या विभाग कार्यालयातील अधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणी पालिका सभागृहात करण्यात आली.


याबाबत पालिका सभागृहात निवेदन करताना वेरावली जलाशय यारी रोड दरम्यान टनेलद्वारे अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिमला पाणी पुरवठा केला जातो. ही जलवाहिनी फुटल्याची तक्रार आल्यावर पाहणी केली असता फरहाद सोसायटी बांदिवली हिल रोड, जोगेश्वरी पश्चिम या ठिकाणी अनधिकृत बोअरवेल खोदून त्या पाण्याची तपासणी केली असता त्यात क्लोरिनचा अंश मिलाल्याने सदर पाणी पालिकेचे असल्याचे लक्षात आल्यावर पालिकेने बोअरवेल खोद्लेल्या ठिकाणी टनेलला छिद्र पडल्याचे समोर आले आहे असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले.

याबाबत फरहाद सोसायटीवर आंबोली पोलिस ठाण्यात एफ़आयआर दाखल करण्यात आला आहे. टनेलला पडलेले छिद्र दुरुस्त करण्यासाठी कंत्राटदाराकडून ऑफर मागवण्यात आली आहे. लवकरच हे छिद्र बुजवनयाचे काम हाती घेण्यात येइल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी पालिका सभागृहात दिली. यावर सभागृहात नगरसेवकानी नुसता एफआयआर नको सोसायटी व वार्डमधील अधिकार्यावर कारवाई करा अशी मागणी केली असता महापौर स्नेहल आंबेकर यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे तसेच होणारा खर्च सोसायटीकडून वसूल करावा असे आदेश महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रशासनाला दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS