मातोश्रीमध्ये ठाकरे परिवाराला डेंग्यू होण्याची वाट बघणार का ? - आरोग्य समितीत विरोधकांचा सवाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 October 2015

मातोश्रीमध्ये ठाकरे परिवाराला डेंग्यू होण्याची वाट बघणार का ? - आरोग्य समितीत विरोधकांचा सवाल

मुंबई / अजेयकुमार जाधव / 6 Oct 2015
मुंबईमध्ये  डेंग्यू फैलावला असून पालिका प्रशासन आणि सत्ताधारी डेंग्यूसारख्या रोगाकड़े दुर्लक्ष करत आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत निषेध व्यक्त करत सत्ताधारी शिवसेनेच्या पक्षप्रमुख राहत असलेल्या मातोश्री निवासस्थानामध्ये डेंग्यू झाल्यावर प्रशासन आणि सत्ताधारी जागे होणार आहे का ? असा प्रश्न कोंग्रेस नगरसेविका पारुल मेहता यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे उपस्थित केला.

पालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत मुंबईमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. घराघरात डेंग्यू पसरत आहे. तरीही प्रशासन आणि सत्ताधारी लक्ष देत नाहि. धुर फवारणी निट होत नाही, डॉक्टर नर्स कर्मचारी व्हेंटीलेटर यांची कमी आहे असे असताना प्रशासन हलगर्जीपणा करत आहे असा आरोप करत आरोग्य समितीची बैठक तहकूब करावी अशी मागणी पारुल मेहता यांनी केली. पारुल मेहता यांच्या सभा तहकुबीच्या मागणीला पाठिंबा देताना विरोधी पक्षाने मतदानाची मागणी केली असता ती मागणी फेटाळल्याने कोंग्रेस सद्स्यानी सभात्याग केला.

आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये सभात्याग केल्यानंतर कोंग्रेस नगरसेवकानी पालिका आयुक्ताची भेट घेतली या भेटी दरम्यान डॉ. अजंता यादव यांनी धूर फवारणीसाठी 250 एमएल औषध दिले होते त्याच्या प्रमाणात वाढ करावी. मान्सून आणि डेंग्यू वाढत असलेल्या काल़ावधीत डॉक्टर नर्स यांची संख्या वाढवावी, एनएस 1 हे डेंग्यूची तपासणी करणारे किट पालिकेच्या सर्व रुग्णालये आरोग्य केंद्रात उपलब्ध करून द्यावे, डेंग्यूचा फैलाव होत असल्याने युद्ध पातळीवर काम करून लोकांचा जिव वाचवावा अश्या मागण्या केल्या.

यावेळी प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनास आणल्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्याचे यादव यांनी पत्रकराना सांगितले. आरोग्य समिती बैठकीत डेंग्यूसारख्या मुद्यावर चर्चा करताना शिवसेनेच्या नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर, डॉ. शुभा राउल, शितल म्हात्रे आणि प्रमिला शिंदे या सदस्या हसण्यावर हा विषय नेत होत्या. यामुळे  शिवसेनेला मुंबईकर जनतेबाबत खरोखरच गंभीर आहे का असा प्रश्न अजंता यादव यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान डेंग्यूबाबत विशेष बैठका लावण्यात आली होती या बैठकीला काँग्रेसचे नगरसेवक गैरहजर राहिले होते अशी माहिती आरोग्य समिती अध्यक्षा सुनिता यादव यांनी दिली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS