लोकांचे मत परिवर्तन करण्याचे काम बहुजन रिपब्लिकन शोशालिस्ट पार्टी करेल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2015

लोकांचे मत परिवर्तन करण्याचे काम बहुजन रिपब्लिकन शोशालिस्ट पार्टी करेल

मुंबई / अजेयकुमार जाधव 
महाराष्ट्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणारे पक्ष आणि नेते भरपूर आहेत.या पक्ष आणि नेत्यानी दबाव गट म्हणून काम केले परंतू त्याना कधिही लोकांचे मतपरिवर्तन करुन मते मिळवन्यात अपयश आले आहे. महाराष्ट्रातील ही कमी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी भरुन काढणार आहे. बहुजन पक्षातील 90 टक्के लोकानी या पार्टीमधे प्रवेश केला असून बहुजन मुस्लिम ओबीसीच्या प्रश्नावर काम करणार आहे. अशी घोषणा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदे मधे सुरेश माने यांनी केली.

स्वतंत्र विदर्भ राज्य बनवावे, ओबीसीची जनगणना करावी, पेसा कायद्याची अमलबजावणी करावी, वनवासी शब्दावर कायमची बंदी घालावी, खाजगी क्षेत्रात आरक्षण मिलावे, गरीब व गरजू मुस्लिमाना सच्चर कमिटी व कुडू कमिटिच्या शिफारशीप्रमाणे आरक्षण मिलावे, ओबीसी व भटके विमुक्तांच्या आराक्षणात क्रीमीलेअर धोरणाचा पुनर्विचार करावा इत्यादी मागण्यासाठी येत्या 15 डिसेंबरला नागपुर येथील हिवाळी अधिवेशनावर लाखो लोकांचा मोर्चा नेणार असल्याचा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे सुरेश माने यांनी दिला आहे.

राज्यातील सातारा, पुणे नाशिक उल्हासनगर बदलापुर कर्जत खोपोली  वसई विरार येथून धम्मचक्र प्रवर्तनदिनी (22 ओक्टोबर) जिप ऱ्याली काढली जाणार असून 24 ओक्टोबरला या ऱ्यालीचे रूपांतर ठाणे, बोरीवली, चेम्बूर, घाटकोपर, वरली, नवी मुंबई येथे जाहिर सभेत होणार आहे. 25 ओक्टोबरला दुपारी सर्व जिप मार्च चैत्यभूमी मधे अभिवादन करून धारावी बस डेपो जवलील कांशीराम नगर  येथे जाहिर सभा घेतली जाणार आहे असे सुरेश माने यांनी सांगितले. आताचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यानी स्वतंत्र  विदर्भाच्या मुद्यावर केलेली भाषने आठवावीत आणि त्वरित विदर्भ वेगाला करावा असे आवाहन माने यांनी यावेळी केले.

Post Bottom Ad

JPN NEWS