मुंबईकरांवरचे पाणी संकट दूर करण्यासाठी मुंबई पालिकेची राज्य सरकारकडे धाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2015

मुंबईकरांवरचे पाणी संकट दूर करण्यासाठी मुंबई पालिकेची राज्य सरकारकडे धाव

मुंबई 5 Oct 2015 ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस पडला नाही त्यामुळे तलावांमध्ये पाणी साठा 15 टक्के कमी आहे हा पाणी साठा मुंबईकराना वषॅभर पुरावा यासाठी पालिकेने मुंबईकरांवर 20 टक्के पाणी कपात लागू केली आहे ही पाणी कपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर आहे हे मुंबईकरांचे मोठे संकट दूर करण्यासाठी पालिका आता पुढे सरसावली आहे भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातून मुंबईला पाणी दया अशी मागणी मुंबई पालिकेने राज्य सरकारकडे केली आहे 

मुंबईला मोडकसागर ,तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा, आणि मध्यवैतरना या सात तलावातून पाणी पुरवठा होत आहे मात्र यंदा तलाव क्षेत्राकडे पावसाने सुरुवाती पासूनच पाठ फिरवल्यामुळे तलावात यंदा पाणी साठा बराचसा कमी आहे गणपती बाप्पाने आपल्या कालावधीत दया दाखवली त्यामुळे मेघराजाने मुंबईकरांना थोडा दिलासा दिला गणपती च्या कालावधीत तलाव क्षेत्रात चांगलाच पाऊस पडला तरी सुद्धा अजून मुंबईकरांना 15 टक्के पाणी साठा कमी आहे त्यामुळे मुंबईकरांना वषॅभर पाणी पुरवठा व्हावा यासाठी.पालिकेने 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून शहरात 20 टक्के पाणीकपात लागू केली आहे मात्र या कपातीमुळे डोंगरमाध्यावर राहणाऱ्या लाखो लोकांना पाणी मिळणे पचंड अडचणीचे झाले आहे या कालावधीत 20 टक्के पाणी कपातीमुळे लोकांची परिस्थिती अशी आहे मग भर उन्हाळ्यात लोकांची परिस्थिती काय होईल ते त्यावेळीच कळेल सध्या सातही तलावात मिळून 11 लाख 62 हजार 598 तर गेल्या वर्षी याच कालावधीत 13 लाख 93 हजार 217 दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे  या 20 टक्के पाणी कपाती पासून मुंबईकरांना दूर करण्यासाठी पालिकेने आता राज्य  सरकारकडे धाव घेतली आहे भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातून  मुंबईसाठी पाणी सोडण्याची मागणी पालिकेने  राज्य सरकारकडे केली आहे मात्र राज्य सरकारने मागणी मान्य केली तर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे असे जलविभागातून सांगण्यात आले

Post Bottom Ad

JPN NEWS