खासदार रामदास आठवले दादरी ला भेट देणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2015

खासदार रामदास आठवले दादरी ला भेट देणार

मुंबई 5 Oct 2015 - गोमांस भक्षण केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांकडून मारले गेलेले मोहम्मद अखलाख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले मंगळवारी दि 6ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील दादरी या गावास भेट देणार आहेत

गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरीतील नागरिक  मोहम्मद अखलाख यांच्या झालेल्या हत्येचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे या प्रकरणातील  दोषी आरोपिन्ना कठोर शिक्षा करावी अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली आहे भारतीय संविधानाने सर्व जाती धर्मीय नागरिकांना व्यक्तीची प्रतिष्ठा तसेच जीव आणि जीवनाच्या संरक्षणाचे तसेच उपासनेचे व्यक्तिस्वातंत्रय दिले आहे यासह दलित मुस्लिमांच्या   संरक्षणाचे सरकारचे कर्तव्य आहे याचे भान उत्तर प्रदेश सरकारने ठेवावेभारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुस्लिम बांधवांच्या रक्षणाचे दिलेले वचन उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्रयानी स्मरणात ठेवून मुस्लिम बांधवांना संरक्षण द्यावे असे आवाहन खासदार रामदास आठवले यांनी केले आहे या पार्श्वभूमीवर खासदार रामदास आठवले दादरी येथे भेट देणार आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS