भाजपा-शिवसेना सरकारने नीट बाजू न मांडल्यामुळेच सुप्रीम कोर्टाने डान्सबारवरील बंदी उठवली . - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2015

भाजपा-शिवसेना सरकारने नीट बाजू न मांडल्यामुळेच सुप्रीम कोर्टाने डान्सबारवरील बंदी उठवली .


भाजपा-शिवसेना नेते व बारमालक असोशिएशन यांच्यात मोठा व्यवहार झाल्याचा नवाब मलिक यांचा आरोप.
मुंबई – दि.15
राज्यातील भाजपा-शिवसेना सुप्रीम कोर्टात नीट बाजू मांडली नाही त्यामुळेच आज सुप्रीम कोर्टाने डान्सबार बंदीउठवली आहे. आमच्या सरकारने 2005 साली दिवंगत नेते आर.आर.पाटील यांच्या पुढाकारने डान्सबार बंदीची महत्वाचा निर्णय  घेतला होता.


परंतु सध्याच्या भाजपा-शिवसेना सरकारने  बारमालकांना लाभ देण्यासाठी घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळेच सुप्रीम कोर्टाने राज्यातील डान्सबार बंदी उठवली आहे. भाजपाच्या नेते, मुख्यमंत्री, शायना एनसी, आशिष शेलार सोबत बार मालकांसोबत बैठक घेतली होती. आदित्य ठाकरेंना सुध्दा हे बारमालक भेटलेले होते. कुठेतरी यामागे मोठा व्यवहार झालेला आहे.त्यामुळे या सरकारने डान्सबारबंदी संदर्भात मवाळ भूमिका कोर्टात मांडली. परिणामी आज कोर्टाने डान्सबारबंदी उठवली आहे.

आमचा स्पष्ट आरोप आहे की मुख्यमंत्री सांगताहेत की मॉनिटरिंग करण्याचा अधिकार आमचा आहे.म्हणजे डान्सबार मालकांकडून हप्ते वाढवून घेण्याचा अधिकार आता त्यांना आता मिळालेला आहे. सरकार जर अशा पध्दतीने वागत असेल तर ते आजिबात आम्ही सहन करणार नाही.सरकारच्या डान्सबार सुरु करण्याच्या भूमिकेला  आम्ही रस्त्यावर उतरुन विरोध करु व डान्सबार बंदीसाठी सरकारला  ठोस भूमिका घेण्यास भाग पाडू.

नाईट लाईफसाठी मवाळ भूमिका – नवाब मलिक
आशिष शेलार आणि आदित्य ठाकरे यांना नाईटलाईफ हवी होती. शिवसेना आणि मुख्यमंत्र्या समवेत बार मालकांच्या अनेक बैठका झाल्या व त्यामध्ये मोठ-मोठे व्यवहार झाले. त्यामुळे राज्य सरकार न्यायालयात ठोस भूमिका मांडू शकले नाही 

Post Bottom Ad

JPN NEWS