मांस विक्रीवरील पालिकेची दोन दिवसाची बंदी उठली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2015

मांस विक्रीवरील पालिकेची दोन दिवसाची बंदी उठली


मुंबईमधे आता फ़क्त दोन दिवसच बंदी
मुंबई / अजेयकुमार जाधव / 9 Oct 2015 
मुंबई महानगर पालिकेच्या वतीने पर्युषण कालात राज्य सरकारच्या बंदी व्यतिरिक्त मांस विक्रिवर लावलेली बंदी पालिका सभागृहात बहुमाताने उठवन्यात आली आहे. पालिका सभागृहात मांस विक्रीवर बंदी घलण्याची मागणी करणार्या भाजपाला शिवसेना कोंग्रेस मनसे राष्ट्रवादी समाजवादी पक्ष यांनी एकाकी पाडल्याचे चित्र सभागृहात दिसले.


जैन धर्मियांच्या पर्युषण कालात राज्य सरकारने मांस विक्रिवर दोन दिवसाची बंदी घातली होती. या बंदी व्यतिरिक्त पालिकेने आपल्या अखत्यारीत 1964 मधे एक व् 1994 मधे एक अशी दोन दिवसाची बंदी घातली होती. यामुले मुंबईमधे 4 दिवस मांस विक्रीवर बंदी होती. यामुले पालिकेने घातलेली मांस विक्री वरील दोन दिवसाची बंदी कायमची उठ्वावी अशी मागणी केली जात होती. परंतू एकट्या भाजपाचा या बंदी उठ्वन्याला विरोध होता. पर्युषण काळात आठही दिवस बंदी असावी अशी मागणी भाजपच्या काही नेत्याकडून करण्यात येत होती.

परंतू मुंबईकर जनतेने केलेल्या विरोधानंतर भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षानी विरोध केल्यावर आणि उच्च न्यायालयाने ताशेरे ओढ्ल्यावर पालिकेने दोन दिवस घातलेली बंदी मागे घ्यावी असे निर्देश महापौर स्नेहल आंबेकर यांनी सभागृहात आयुक्ताना दिले होते. पालिका सभागृहात 1964 व् 1994 या वर्षी दोन दिवस मांस विक्रीवर घातलेली बंदी उठावण्यासाठी प्रस्ताव रिओपन करावा अशी मागणी प्रस्तावाद्वारे समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली होती.

या प्रस्तावाच्या मागणीवर भाजपाने मतदानाची मागणी केली. यावेळी 1964 ची बंदी उठवण्यासाठी 111 मते पडली तर बंदी रहावी म्हणून भाजपाची 24 मते पडली. 1994 ची बंदी उठवण्यासाठी 113 मते पडली तर बंदी रहावी म्हणून भाजपाची  23 मते पडली. सभागृहात हे दोन्ही प्रस्ताव रिओपन करून बहुमताने रेकोर्ड करण्यात आले आहेत. यामुले आता मुंबईमधे राज्य सरकारने मांस विक्रिवर घातलेल्या दोन दिवसच बंदी राहणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS