बेस्टचा सन 2016 -17 चा 6 हजार 641 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2015

बेस्टचा सन 2016 -17 चा 6 हजार 641 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर


मुंबई / अजेयकुमार जाधव / 9 Oct 2015 
मुंबईची दूसरी लाईफलाइन असलेल्या बेस्टचा सन २०१६-१७ साठीचा 6 हजार  641 कोटी रुपयांचा अंर्थसंकल्प बेस्टचे महाव्यवास्थापक जगदीश पाटील यांनी बेस्टचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर याना सादर केला. सन २०१६-१७ साठीचा  अर्थसंकल्प एक लाख रुपयांच्या शिलकीचा असून प्रवाश्यांवर कुठलीही दरवाढ लाद्ल्यात आलेली नाही


कर्जामधे अडकलेल्या बेस्ट प्रशासनाकडून बेस्टला फायद्यामधे आणण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. बेस्टच्या सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात विद्युत पुरवठा विभागासाठी 33 केव्ही नवीन संग्रही उपकेंद्रे सुरु करण्यात येणार आहे. परल, सीतलादेवी , महालक्ष्मी आणि कसारा ही उपकेंद्रे 33 केव्ही क्षमतेमधे रुपांतरित करण्यात येणार आहे.

बस गाड्यांच्या वेळापत्रकांचे संगणीकरण करण्यात येणार आहे, प्रवासी माहिती प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे, ब्लुमबर्ग रस्ते सुरक्षा प्रकल्पा अंतर्गत रस्ते सुरक्षाबाबत उपाययोजनांचा अवलंब केला जाणार आहे, बस प्रवास आकर्षक आणि आर्थिकदृष्टया किफायतशिर ठरण्याकरिता उपाययोजना आखल्या जाणार आहेत, बस आगारांचे पुनर्निर्माण केले जाणार असून 25 कोटी रुपये खर्च करून 50 वातानुकुलित मिडी बसेस विकत घेतल्या जाणार आहेत.

घाट्यामधे असलेल्या बेस्टमधे काटकसरीकरीता क्युमिन्स इंजिन ब्लोकचे पुनर्स्तरिकरण केले जाणार आहे. एमयुटीपी 3 च्या बस गाडयांवर रोटरी एफआयपी ऐवजी एनलाइन एफआयपीचा वापर केला जाणार आहे. टाटाच्या सीएनजी बस गाड्यांवरील क्लच ऑपरेटिंग यंत्रणे मधे सुधारणा केली जाणार आहे, परिवहन सेवेचे मार्केटिंग करण्यासाठी नविन कक्ष स्थापन करण्यात आला आहे अशी माहिती बेस्टचे महाव्यवास्थापक जगदीश पाटिल यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS