मरेवर पेपरलेस मोबाइल तिकीट ७ ऑक्टोबरपासून - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2015

मरेवर पेपरलेस मोबाइल तिकीट ७ ऑक्टोबरपासून

मुंबई : पश्‍चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेवर पेपरलेस मोबाइल तिकीट योजना येत्या ७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या सात रेल्वे स्थानकांवर कॅश-कॉईन ऑपरेटेड मशीन्सची सोयही करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ७ ऑक्टोबर रोजी या दोन्ही सेवांचे उद््घाटन करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पेपरलेस मोबाइल तिकीट योजनेमध्ये दैनंदिन तिकीट, मासिक-त्रैमासिक पास आणि प्लॅटफॉर्म तिकीटसुद्धा मिळणार आहे.

पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने पेपरलेस मोबाइल तिकीट योजना यापूर्वीच सुरू केली आहे; परंतु मध्य रेल्वे मार्गावर पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आली नव्हती. परेवरील मोबाइल तिकीट योजनेमध्ये पास, प्लॅटफॉर्म तिकीट मिळत नसल्यामुळे प्रवाशांनी याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे मरेवर ही त्रुटी दूर करण्यात आली आहे. मरेवरील पेपरलेस मोबाइल तिकीट योजनेमध्ये सर्व प्रकारचे तिकीट, पास मिळण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे मरेवरील तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होईल, असा आशावाद अधिकारी व्यक्त करत आहेत.

परेवर पेपरलेस मोबाइल तिकिटांची दैनंदिन विक्री केवळ ५00 पुरती र्मयादित होती. त्यामुळे ही संख्या वाढवण्यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी परेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांनी प्रय▪सुरू केले होते. या पार्श्‍वभूमीवर मरेने प्लॅटफॉर्म तिकिटापासून पासही मोबाइलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा प्रवाशांना दिली आहे. त्यामुळे पेपरलेस मोबाइल तिकिटाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास अधिकार्‍यांना वाटत आहे. या योजनेसाठी इस्त्रोकडून रेल्वे स्टेशन आणि परिसराचे उपग्रहाच्या मदतीने भूमापन करण्यात आले आहे. मरेवरील स्टेशन परिसराची व्याप्ती मोठी असल्याने त्यास वेळ लागल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS