खतरनाक सलमानच्या मुसक्या आवळल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2015

खतरनाक सलमानच्या मुसक्या आवळल्या


मुंबई \ 13 ऑक्टोबर 2015 \ रशिद इनामदार
मानखुर्द पोलिसांनी तीन दिवसाच्या अथकं शोध मोहिमेनंतर सलमान रहीम खान च्या मुसक्या आवळल्या. सलमानच्या नावावर डझनावारी गुन्ह्यांची नोंद मानखुर्द पोलिस ठाण्यात आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरणाच्या गुन्ह्यात शुक्रवारी त्याला अटक करण्यासाठी पोलिस पथक गेले होते . त्यावेळी पोलिस हवालदार मारुती वाघमारे यांच्यावर तलवारीने वार करून तो फरार झाला होता.


पोलिस उप निरीक्षक प्रविण पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार , चोरी ,मारामारी ,धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ले अशा किमान डझनभर गुन्ह्यांची नोंद असलेला सलमान शुक्रवारी वाघमारेंवर हल्ला करून पसार झाला होता. वाशी खाडीतील चिखल आणि अंधाराचा फायदा घेवुन तो पळाला होता.तो खाडीतुन देवनार डंपिंग ग्राउंडकडे पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक त्याच्या शोधात तिकडे  गेले. पोलिसांना पहाताच तो तिथुनही पळुन गेला.पोलिस कसुन शोध घेतो परंतु दोनदा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता.दिवसभर पोलिस उप निरीक्षक विजय कावळे आणि रात्रीच्या वेळी उप निरीक्षक प्रकाश जावीर आपल्या पथकासह त्याचा शोध घेत होते.दिवसरात्र शोध घेऊनही सलमान काही सापडत नव्हता. पोलिसांनी मात्र त्याचा शोध सुरूच ठेवला.तो 13 ऑक्टोबर मंगळवारी दुपारी वाशी रेल्वे स्थानकाजवळ मित्राला भेटायला येणार असल्याची पक्की खबर पांडेना मिळाली.वरिष्ठ पोलिस निरीक्षक नसीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक प्रविन पांडे यांच्या पथकाने वाशी रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावला होता.तेव्हा सलमान रेल्वेने मानखुर्द ला जाणार असल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांनी तो मानखुर्द ला पोहोचण्याआधी मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर सापळा लावला. तो पोलिसांवर हल्ला करून पुन्हा पळणार नाही याची काळजी प्रामुख्याने घेण्यात आली .संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास अत्यंत शिताफीने त्याला पकडण्यात प्रविन पांडे आणि पथकाला यश आलं .

या पथकामध्ये प्रविण पांडे यांच्या नेतृत्वखाली पोलिस हवालदार खरात ,भोईटे व  सलमान ने वार करून गंभीर इजा केलेले मारुती वाघमारे यांचा समावेश होता. या पथकाचे सहकार्यांकडुन व परीसरातील नागरिकांकडुन कौतुक होताना दिसत आहे .

Post Bottom Ad

JPN NEWS