बेस्ट परिवहन सेवेच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक ,विद्युत सेवा फायद्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2015

बेस्ट परिवहन सेवेच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक ,विद्युत सेवा फायद्यात

मुंबई / प्रतिनिधी - 
मुंबई दुसरी लाईफलाईन बेस्ट तोट्यात आहे. बेस्टचा परिवहन विभाग तोट्यात असताना विद्युत विभागाला मात्र फायदा होत आहे. बेस्टच्या विद्युत विभागाला होणाऱ्या फायद्यामुळे बेस्ट उपक्रमाची गाडी हाकली जात आहे.


बेस्ट उपक्रमाला मागील आथिर्क वर्ष २०१४-१५ मध्ये ६७ कोटी रुपयांचा फायदा झाला. बेस्ट प्रशासन मुंबईतील वीज ग्राहकांकडून परिवहन भार वसूल करीत असते. ही रक्कम ६६१.९५ कोटी इतकी होती. तर, विद्युत विक्रीद्वारे ६५२.८८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र, विद्युत विभागाच्या उत्पन्नात जाहिरातींद्वारे मिळणा-या उत्पन्नात ८.१५ कोटी रुपयांची घट झाली असल्याची माहिती बेस्टमधील सूत्रांनी दिली. 

बेस्टने बस भाडेवाढ केल्यानंतर उत्पन्नात काही प्रमाणात वाढ झाली. परिवहन विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली असली तरी खर्चातही वाढ झाली आहे. मात्र, जाहिरातींद्वारे बेस्टला मिळणा-या उत्पन्नात २९.९७ कोटी रुपयांची घट झाली. तर, जमीन आणि इमारतीच्या भाडय़ांद्वारे मिळणा-या उत्पन्नात ६.१३ कोटी रुपयांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्पन्न आणि खर्च 
विद्युत
साल            उत्पन्न          खर्च
२०१३-१४   ३९७७.९१ कोटी    ३८००.५५ कोटी
२०१४-१५   ४६२५.२२ कोटी    ३६९९.८० कोटी
परिवहन
साल           उत्पन्न          खर्च
२०१३-१४   १४४७.३५ कोटी    २२१५.०९ कोटी
२०१४-१५   १५०९.६५ कोटी    २३६७.६७ कोटी

Post Bottom Ad

JPN NEWS