स्थानिक झोपडीधारक करणार टाळा बंद आंदोलन !
चेंबूरच्या ना. ग. आचार्य मार्गावर असलेल्या आनंद नगरात बहुतांशी कचरा वेचक कामगार व मागासवर्गीयांची लोकवस्ती असून 408 झोपड्या या ठिकाणी आहेत. तर याच आनंद नगराच्या पाठीमागे असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर 1984 साली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून देवालय नावाची खाजगी इमारत बांधली. ज्या वेळेला देवालय इमारतीचे बांधकाम चालू होते त्यावेळेला आनंद नगरात असलेल्या कच्च्या रस्त्यातून बांधकामाचे सर्व साहित्य नेण्यात आले. आजही त्या ठिकाणी कच्चा रस्ता अस्थित्वात आहे. देवालय इमारत तीन मजली असून त्यामध्ये पालिकेत मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांचे 16 कुटुंबीय राहतात. सध्या या इमारतीला पालिकेने धोकादायक इमारत म्हणून घोषित केले असून इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली आहे.
मुंबई / प्रतिनिधी -: चेंबूरच्या आनंदनगरमध्ये असलेली धोकादायक देवालय इमारत पाडण्याच्या नावाखाली या भागातील दीडशे झोपडी तोडणार असून त्याबाबतचा सर्व्हे पालिका येत्या दोन दिवसात करणार आहेत. पालिका सर्व्हे करतील त्या दिवशी या भागातील सर्व झोपडीधारक आपल्या घराला टाळे लावून आंदोलन करणार आहेत.
चेंबूरच्या ना. ग. आचार्य मार्गावर असलेल्या आनंद नगरात बहुतांशी कचरा वेचक कामगार व मागासवर्गीयांची लोकवस्ती असून 408 झोपड्या या ठिकाणी आहेत. तर याच आनंद नगराच्या पाठीमागे असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर 1984 साली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून देवालय नावाची खाजगी इमारत बांधली. ज्या वेळेला देवालय इमारतीचे बांधकाम चालू होते त्यावेळेला आनंद नगरात असलेल्या कच्च्या रस्त्यातून बांधकामाचे सर्व साहित्य नेण्यात आले. आजही त्या ठिकाणी कच्चा रस्ता अस्थित्वात आहे. देवालय इमारत तीन मजली असून त्यामध्ये पालिकेत मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांचे 16 कुटुंबीय राहतात. सध्या या इमारतीला पालिकेने धोकादायक इमारत म्हणून घोषित केले असून इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली आहे.
इमारत पाडण्यासाठी व त्याच्या बांधकामाचे साहित्य बाहेर नेण्यासाठी पालिकेने आनंद नगरातील दोन ठिकाणाहून 9 मीटरचा रस्ता नव्याने निर्माण करायचे ठरवले आहे. या दोन रस्त्यांसाठी आनंद नगरातील दीडशे झोपड्या तोडून त्यांना हंगामी स्वरुपात संक्रमण शिबिरात राहण्याची सोय करण्यात येणार आहे. मात्र याला येथील झोपडी धारकांनी विरोध केला असून सिटी सर्व्हे क्र. 15, 16, पिटी 31 या जागेवर असलेल्या झोपड्या 1999 साली गलिच्छ वस्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे. या ठिकाणी एसआरएची योजना राबण्यात येत असून 2010 साली त्याचे परिशिष्ठ 2 एम पश्चिम विभागाने प्रसिध्द केले आहे असे असतानाही जाणूनबुजून पालिका हा अन्याय करत असल्याचा आरोप आनंदनगर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, देवालय इमारत तोडून त्याचे बांधकाम साहित्य बाहेर नेण्यासाठी कच्चा रस्त्यातून न्यावे. 9 मीटरचे दोन रस्ते कशासाठी याचाच अर्थ पालिका आपल्या 16 बड्या अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी दीडशे मागासवर्गीय व कचरा वेचक कामगारांच्या घरांवर बुलडोजर फिरवत आहेत. या झोपडपट्टीच्या पाठीमागे ही इमारत असल्यामुळे येथील झोपडीधारकांना हटवण्याचा हा डाव हाणून पाडू असेही अरुण पवार यांनी सांगितले. तर येत्या दोन दिवसात पालिका अधिकारी सर्व्हे करायला येणार असून त्या दिवशी आनंदनगरातील प्रत्येक झोपडीधारक आपल्या घराच्या दरवाज्याला टाळे लावून निषेध नोंदवणार असल्याचे स्थानिक रहिवाशी प्रल्हाद गायकवाड, मिलिंद जाधव, लता कदम, शोभा वाडेकर यांनी सांगितले.