दाऊदच्या मुंबईतील 12 मालमत्तांचा होणार लिलाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

30 November 2015

दाऊदच्या मुंबईतील 12 मालमत्तांचा होणार लिलाव

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील बारा मालमत्तांचा लिलाव होणार आहे. दाऊदच्या स्थळावर घाव घालण्यासाठी सरकारने मोठा जामानिमा केलाय खरा; पण गुन्हेगारी विश्वाशी संबंधित अशा लिलावांचा पूर्वेतिहास पाहता कोट्यवधी रुपयांच्या या मालमत्ता विकत घेण्यासाठी कोण पुढे येणार? याबद्दल उत्सुकतेसोबतच साशंकताही आहे. कारण या मालमत्तांची खरेदी म्हणजे थेट दाऊदशी पंगा आणि तपास यंत्रणांचा ससेमिरा असा दुहेरी ताप...म्हणूनच या लिलावाला कसा प्रतिसाद मिळतो त्याकडे सरकार, पोलिस आणि गुन्हेगारी विश्वाचेही लक्ष लागले आहे.

दाऊद पाकिस्तानात असला तरी त्याची मुंबईतील आपल्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर असते. मुंबईत आपल्या सुरुवातीच्या काळात साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून नैतिक किंवा अनैतिक मार्गाने दाऊदने उभ्या केलेल्या साम्राज्याच्या काही खुणा आजही या मालमत्तांच्या रूपाने त्याच्या दहशतीची साक्ष देत या शहरात उभ्या आहेत. पूर्वी कधीकाळी त्याच्या पुढेमागे फिरणारे छाडमाड तरुण आताशा बिल्डर किंवा तत्सम व्यवसायात स्थिरावलेत. तेच आता या मालमत्तांसह त्याचे आर्थिक व्यवहार छुपेपणाने हाताळतात. दाऊद भारतातून पळून गेल्यानंतर या मालमत्ता आयकर विभागाने हळूहळू ताब्यात घेतल्या. सरकारी कागदपत्रात आजही या मालमत्ता सील केल्याची नोंद असली तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. दाऊदच्या हस्तकांमार्फत या मालमत्तांचा आजही बिनधास्तपणे व्यावसायिक वापर होतो आहे. हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत असूनसुद्धा सरकारी यंत्रणा काहीच करू शकत नाही. कारण या मालमत्ता सील केल्या तरी त्या अवैधरित्या पुन्हा ताब्यात घेतल्या जातात. यावर उपाय म्हणून आता या मालमत्तांचा लिलाव करण्याचा उपाय आयकर विभागाने आजमावण्याचे ठरवले आहे.

अशा लिलावांना मिळणाऱ्या तुरळक प्रतिसादाविषयी माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, पूर्वीदेखील दाऊदच्या एका मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र हल्ली गुन्हेगारी विश्वाची भीती तितकीशी राहिली नसल्याने यावेळी कदाचित या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळेल.

या जागांचे भाव व्यावसायिक वापरासाठी ३० ते ५० हजार तर निवासी वापरासाठी २० ते २५ हजार रु. प्रति चौरस फूट आहेत. या हिशेबाने ही किंमत अडीचशे ते तीनशे कोटींच्या घरात जाते, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे आनंद गुप्ता म्हणाले. मुंबईतीलच अश्वीन अॅन्ड कंपनीवर या लिलावाची जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपनीचे मालक अश्वीनभाई यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता त्यांनी या लिलावाच्या माहितीला दुजोरा दिला. ३ डिसेंबरपासून लिलावाची ही प्रक्रिया सुरू होणार असून खरेदीसाठी इच्छुकांना ८ डिसेंबरपर्यंत या मालमत्ता पाहता येणार आहेत. ९ डिसेंबरला लिलाव पुकारला जाणार असल्याचे अश्वीनभाई म्हणाले. अजूनपर्यंत तरी यासाठी एकाही इच्छुकाने आपल्याशी संपर्क साधला नसून २ डिसेंबरला आपण माझ्याशी पुन्हा संपर्क करा, तेव्हा मी अधिक माहिती देऊ शकेन असेही अश्वीनभाई म्हणाले.

दाऊदच्या मुंबईतील स्थावर मालमत्ता- 
राजगारा मेन्शन, पहिला ते चौथा माळा, बीबी जनपथ
- पाकमोडिया स्ट्रीट क्रमांक ४, भायखळा, मुंबई -०३
- डांबरवाला बिल्डिंग, १७/२१ पाकमोडिया स्ट्रीट, भायखळा, मुंबई-०३
- ३४/ ४० याकूब स्ट्रीट्स, भुलेश्वर
- २४ रेसिडेन्शियल बिल्डिंग, याकूब स्ट्रीट, भुलेश्वर
- २२/३२ इंडस्ट्रियल गाला, शेड नंबर १, जयराजभाई लेन, ताडदेव
- हुमेरा इंजिनिअरिंग वर्क्स, जयराज भाई लेन, ताडदेव
- प्लॉट क्रमांक २२, टेमकर स्ट्रीट, भायखळा, मुंबई ०३
- ९९/१०१ घासवाला बिल्डिंग, टेमकर स्ट्रीट, भायखळा, मुंबई-०३
- गरीबनवाज गेस्ट हाऊस, इस्माईल बिल्डिंग, भायखळा, मुंबई-०३
- म्हाडा बिल्डिंग क्रमांक ४९, मांडवी
- A-१२, गार्डन हॉल, डोंगरी पोलिस ठाण्यासमोर, दिमतीमकर मार्ग, भायखळा

( दिव्य मराठी मधून साभार)

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS