26/11 च्या अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

26/11 च्या अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

Share This
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

मरीन लाईन्स पोलीस जिमखाना येथील स्मारकाला मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) प्रा. राम शिंदे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शहिदांच्या कुटुंबियांसमवेत शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलीस दलातील आजी-माजी वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages