२७ नोव्हेंबर: अवयवदान दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२७ नोव्हेंबर: अवयवदान दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम

Share This
मुंबई / प्रतिनिधी - २७ नोव्हेंबर२०१५ रोजीच्या राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे महापालिका क्षेत्रात विशेष जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेतयामध्ये पहिला कार्यक्रमसकाळी ९.३० वाजता आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे होणार आहे.या कार्यक्रमात अवयवदान प्रक्रियेमध्ये पोलीसांची भूमिका यावर के..एम. (रा..स्मा.) रुग्णालयाच्या डॉकामाक्षी भाटे व डॉ.सुजाता पटवर्धन या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

त्यानंतर वैद्यकीय व्यवसायीकांसाठी असणारा दुसरा कार्यक्रम दुपारी ०१.०० वाजता परळ परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के..एमरुग्णालयात होणार आहे. 'ब्रेन डेडझालेल्या व्यक्तीचा हात,दुस-या व्यक्तीच्या तुटलेल्या हातावर प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट)करण्याची अत्यंत कठीण अशी सूक्ष्म शस्त्रक्रिया (मायक्रो सर्जरी)करणारे केरळ मधील कोची येथील डॉसुब्रमण्यम अय्यर हे या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेतमहापालिका क्षेत्रातील काही महाविद्यालयांमध्ये देखील जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेततसेच ज्या व्यक्तींना अवयव दानासाठी `दाताम्हणून नोंदणी करायची असेल त्यांच्यासाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये दाता नोंदणी करता येणार आहे


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages