संविधानामुळे भारत अखंड - महापौर स्नेहल आंबेकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संविधानामुळे भारत अखंड - महापौर स्नेहल आंबेकर

Share This
मुंबई दि २6: प्रतिनिधी  -  आज भारतात नाना पंथ, जाती, आणि धर्म आहेत. विविध भाषा आणि संस्कृती असूनही भारत देश अखंड आहे.  युगपुरूष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज भारत अखंड आणि बलवान असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी दादरच्या चैत्यभूमीवर केले. यावेळी त्यांनी संविधान सरनामाचे जाहीर वाचन केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त भारतीयांना २६  नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान सरनामा अगीकृत व अधिनियम केला या घटनेला ६७ वर्ष पूर्ण होत असल्याने कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेच्या वतीने चैत्यभूमीवर ":जागर संविधानाचा सन्मान भारताचा " हा कार्यक्रम दादरच्या चैत्यभूमीवर सकाळी 12 वाजता आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना महापौर स्नेहल आंबेकर म्हणल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील तळागाळ तील.गरिब आणि श्रीमंत यांना समान हक्क दिले.  स्वतंत्र. बंधुत्व आणि समता आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा व त्याला सुंदर जिवन जगता  यावे असे कायदे संविधानत अंतर्भूत केले. स्रीयांना मोठ्या प्रमाणात कायदेशीर अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकर मिमिळवून दिले.म्हणून भारताचे संविधान जागात आदर्श ठरले आहे. असेही महापौर म्हणाल्या.  यावेले महापौर आंबेकर यांनी संविधानाच्या सरनामा सामुदायिक वाचन करून सर्वाना शपथ दिली.  यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपक पवार यांनी केले.

यावेळी भिक्कु दादा ईदाते, श्रवण राठोड, समन्वय समितीचे नागसेन कांबळे,  कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटने अध्यक्ष प्रकाश मोरे,  कार्यध्यक्ष चंद्रकिरण सकपाळ,  सरचिटणीस गणेश खैरे. खजिनदार बबनभाई राजापकर, उपाध्यक्ष संघराज तांबे आदींची भाषणे झाली. नाटकाच्या निर्मात्या कवयित्री कविता मोरवणकर यांनी कविता वाचन केले.शाहिरी गीते गाण्यात आली मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages