मुंबई - मुंबईवर सात वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुंबई पोलिस आयुक्त अहमद जावेद, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहिदांच्या कुटुंबियांसोबत श्रद्धांजली अर्पण केली. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे अभिनेत्री जुही चावलाने श्रद्धांजली दिली.
सीएसटी येथील कामा रुग्णालयात दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यात रुग्णालयातील सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शहिदांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली वाहताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. सिनेअभिनेती जुही चावलाने मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. रेल्वेच्या एका संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. तेथेही जुही हजर होती. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम झाले. एआयएटीएफचे अध्यक्ष एम. एस. बीटा यांनी गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहिले. रात्री काही सामाजिक संस्थांनी सीएसटी ते गेट वे ऑफ इंडिया कॅंडल मार्च काढला होता.

No comments:
Post a Comment