पालिकेची दिखाऊ कारवाई - जप्त सिलिंडर्स उपाहारगृहांना परत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेची दिखाऊ कारवाई - जप्त सिलिंडर्स उपाहारगृहांना परत

Share This

मुंबई - कुर्ला येथील "सिटी किनारा‘ उपाहारगृहाला लागलेल्या आगीमध्ये ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिल्या नंतर पालिका प्रशासनाने उपाहारगृहांविरोधात कारवाई केली. बेकायदा सिलिंडर्सचा साठा जप्त केला. त्याचबरोबर बेकायदा बांधकामांवर कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली; मात्र वातावरण निवळताच जप्त सिलिंडर्स पुन्हा 
उपाहारगृहांना परत देण्यात आले आहेत. पालिकेकडे सिलिंडर्स ठेवण्यासाठी जागाच नसल्याचे कारण यासाठी देण्यात येवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोग्य समितीच्या बैठकीत प्रशासनाने सांगितले आहे.
पालिकेच्या सर्व विभागांनी कारवाई सुरू केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उपाहारगृहांना कुलूप लावण्यात आले. बेकायदा सिलिंडर्सचा साठा जप्त करण्यात आला; तसेच उपाहारगृहांच्या बेकायदा बांधकामावरही कारवाई करण्यात आली; मात्र वातावरण निवळताच पालिकेची कारवाई थंडावली. एवढेच नव्हे; तर जप्त सिलिंडर्स उपाहारगृहांना परत करण्यात आले. पालिकेडे जागा नसल्याने उपाहारगृहांना ते परत करण्यात आले असल्याचे आरोग्य समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून सांगण्यात आले, अशी माहिती सदस्यांनी दिली.

"सिटी किनारा‘ उपाहारगृहाच्या कारवाईचा अहवाल दोन महिने उलटले तरी आरोग्य समितीत सादर झाला नाही. यावरून शिवसेनेच्या ऍड. अनुराधा पेडणेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई केली, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आरोग्य समितीची बैठक होऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यावर त्यांना सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. अखेरीस ही बैठक तहकूब करण्यात आली.

- 18 दिवसांत एक हजार 936 सिलिंडर जप्त
- मालाड- 187
- कुर्ला- 111
- कांदिवली- 150
- बोरीवली- 115
- भायखळा- 124
- दहिसर- 130 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages