शीना बोरा हत्याकांड - पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत ११ जानेवारीपर्यंत वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शीना बोरा हत्याकांड - पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत ११ जानेवारीपर्यंत वाढ

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 28 Dec 2015   
शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयाने अटक केलेल्या पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत आज (सोमवारी) ११ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पीटर मुखर्जीच्या न्यायलयीन कोठडीत वाढ होण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वी १४ डिसेंबरला झालेल्या न्यायलयीन खटल्यात २८ डिसेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. आज ती वाढून ११ जानेवारीपर्यंत केली आहे.

शीना बोरा हत्याकांडामध्ये आर्थिक हितसंबंध असून त्या दिशेने तापस करण्यासाठी पीटर यांची आणखी चौकशी करावी लागेल हा सीबीआयचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला आहे. शीना बोराच्या हत्येमागे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये पीटर आणि इंद्राणीची मालमत्ता आहे. मात्र या मालमत्तेबाबत दोघांकडूनही पुरेशी माहिती मिळालेली नाही. तसेच शीनाच्या एचएसबीसी बँकेच्या खात्यात पैसे ठेवण्यात आल्याचा अंदाज असून याप्रकरणी एचएसबीसी बँकेच्या खात्यासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी इंटरपोलकडे मागणी केली आहे.
२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची गळा आवळून हत्या केल्याची कबुली इंद्राणीच्या ड्रायव्हरने दिली होती. गाडीमध्ये गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह रायगडजवळ जाळण्यात आला. शीनाची हत्या झाली, त्यावेळी इंद्राणी गाडीत असल्याची माहितीही ड्रायव्हरने दिली आहे. शीनाचा मृतदेह २३ मे २०१२ रोजी रायगडजवळ आढळून आला होता. हत्येप्रकरणी आधी शीनाची आई इंद्राणीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकातामधून अटक झाली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages