वाळुंज कुटंुबियांपैकी एका व्यक्तीला शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत सामावून घ्या - सचिन अहिर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वाळुंज कुटंुबियांपैकी एका व्यक्तीला शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत सामावून घ्या - सचिन अहिर

Share This
रमेश वाळुंज यांच्या कुंटुंबियांना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची पन्नास हजारांची मदत
मुंबईJPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in 
वांद्रे येथील बॅन्डस्टँडवर बुडणाऱ्या मुलींचे प्राण वाचवताना जीव गमावलेल्या रमेश वाळुंज यांच्या कुटंुबियांना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष सचिन अहिर यांनी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात आली आहेतसेच वाळुंज हे त्यांच्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याने त्यांच्या पश्चात वाळुंज यांच्या पत्नी अथवा कुटंुबियांपैकी किमान एका व्यक्तीला महापालिका किंवा राज्य सरकारने सरकारी अथवा निमसरकारी नोकरीत समाविष्ट करण्याची मागणीही अहिर यांनी केली आहे.


वांद्रे येथील बँन्डस्टँडवर सेल्फी काढण्याच्या नादात समुद्राच्या पाण्यात बुडणाऱ्या तीन महाविद्यालयीन तरूणींना वाचवताना रमेश वाळुंज यांनी आपले प्राण गमावलेत्यांच्या या साहसाला सलाम करत माअहिर यांनी आज त्यांना पन्नास हजार रुपयांची मदत देऊ केलीयावेळी बोलताना माअहिर म्हणाले की,रमेश वाळुंज यांच्या निधनामुळे वाळुंज कुटंुबियांचे झालेले नुकसान कधीच भरून येणार नाहीरमेश वाळुंज हे त्यांच्या कुंटंुबातील एकमेव कमावती व्यक्ती होते त्यामुळे या कुटुंबाला निव्वळ आर्थिक मदत देऊन भागणार नाहीतर रमेश वाळुंज यांच्या पत्नी किंवा या कुटंुंबातील एखाद्या व्यक्तीला सरकारी किंवा निमसरकारी नोकरीत समावून घेण्याची गरज आहेत्यामुळे राज्य सरकार आणि महापालिका या दोन्हीकडच्या सत्ताधाऱ्यांना मी आवाहन करतो कीलवकरात लवकर याबाबत आवश्यक त्या प्रक्रिया पुर्ण करून योग्य तो निर्णय घेऊन वाळंुज कुटंुबियांना दिलासा द्यावाअशी आग्रही मागणी अहिर यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages