गोरेगांव येथील महापालिकेच्या सिद्धार्थ रुग्णालयात अत्याधुनिक सेवा-सुविधा - उद्योग मंत्री सुभाष देसाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोरेगांव येथील महापालिकेच्या सिद्धार्थ रुग्णालयात अत्याधुनिक सेवा-सुविधा - उद्योग मंत्री सुभाष देसाई

Share This
JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in 
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई क्षेत्रातील वाढती लोकसंख्या व या शहरांत येणारे रोजचे प्रवासी यांचा विचार करता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेवर मोठा भार पडतो. तरीही महापालिका आपले कार्य यशस्वीपणे पार पाडीत आहे. महापालिकेचे गोरेगांव येथील सिद्धार्थ रुग्णालयसुद्धा अत्याधुनिक सेवा-सुविधेने सज्ज असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले. सिद्धार्थ रुग्णालय येथे क्रस्ना डायनोस्टीक प्रा.लि. यांच्या सहकार्याने पी.पी.पी. च्या धर्तीवर सीटी स्कॅन मशिनचे उद्घाटन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देसाई बोलत होते.  



उद्योग मंत्री सुभाष देसाई पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना उत्तमप्रकारे सेवा देत असते. महापालिकेचा कामाचा व्याप लक्षात घेता आरोग्य विभागही त्याच यशस्वीपणे काम करीत आहे. गोरेगांव येथील सिद्धार्थ रुग्णालय जेव्हापासून आपली सेवा सुरु केली आहे, तेव्हापासून या रुग्णालयात अत्याधुनिक अशी यंत्रणा कार्यरत आहे. रक्तपेढी, अतिदक्षता कक्ष आणि आता २४ तास सीटी स्कॅनची सुविधा नागरिकांना मापक दरात सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. गोरेगांवकरांची मागणी लक्षात घेऊन याठिकाणी लवकरच शवविच्छेदन केंद्रही सुरु करावे, असे देसाई यांनी आवाहन केले.

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी यावेळी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने सिद्धार्थ रुग्णालयात सीटी स्कॅन मशिन उपलब्ध करुन नव्या वर्षाची ही एक भेट दिली आहे. पालिकेच्या रुग्णालयात अत्यंत कमी किंमतीत या सेवा-सुविधा उपलब्ध करुन देत असतात. पालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य सेवेवरील व्याप लक्षात घेता पालिकेचे रुग्णालय हे सक्षम असल्याचे प्रतिपादन महापौर आंबेकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages