योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा - राजेश वर्मा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 January 2016

योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा - राजेश वर्मा

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in
मुकेश श्रीकृष्ण धावडे
"खादी व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन"(KVIC) भारत सरकार आणि ह्यूमन राइट्स फोरम च्या सयुंक्त विद्यमाने तळागाळातील कार्यक्षम तथा अकार्यक्षम तरुण तरुणींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्याचे काम फोरमला अधिकृत रित्या सोपविण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या पहिला बेकरी प्रोडक्स या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन कांजूर - भांडूप पूर्व येथील मनसेच्या सभागृहात करण्यात आले असून कांजूर मार्ग पूर्व दातार कॉलनी येथील वैष्णवी ब्युटी सेंटरचे आणि भांडूप गाव येथील अनिता ब्युटी सेंटर चे उदघाटन देखील संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश वर्मा आणि फोरमचे संस्थापक डॉ. दिनेश पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी करण्यात आले.  
महिला आणि पुरुष समानता राखत केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुष वर्गासाठी देखील प्रशिक्षणाबरोबर रोजगार व स्वयंरोजगार करण्याची सर्वउत्कृष्ठ संधी ह्युमन राईट्स फोरमच्या माध्यमातून सर्व स्तरावरील महिला व पुरुष वर्गाला उपलब्ध करण्यात आली आहे याचा लाभ घेवून प्रत्येक  नागरिकांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे असा सल्ला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश वर्मा यांनी गणराज्य दिनाचे औचित्य साधून (ता. 26) जानेवारी रोजी कांजूर - भांडूप पूर्व येथे आयोजित केलेल्या व्यवसायभिमुख प्रशिक्षणाच्या उदघाटन सोहळ्यादरम्यान दिला. 
   
तर उपस्थितांना मार्गदर्शन करताना फोरमचे संस्थापक डॉ. दिनेश पाटील म्हणाले कि केवळ प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार देण्याचा हेतू नसून सर्व स्तरावरील गरजू नागरिकांना एकत्र एका व्यासपीठावर आणून समाजात या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम कार्य घडवणे हा देखील त्या मागचा हेतू असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले . तसेच या प्रशिक्षानंतर उद्योग , व्यवसाय करण्यासाठी प्रशासनाकडून या योजनेच्या अंतर्गत निधी देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी फोरमचे संस्थापक डॉ. दिनेश पाटील, राष्ट्रीय कायदेविषयक सल्लागार प्रदीप खानोलकर, राष्ट्रीय सहसचिव किरण मेस्त्री, फोरम महिला अध्यक्ष भारती बारस्कर, मनसे कामगार सेना  अध्यक्ष मनोज चव्हाण, दिपाली पाटील, विना घाडीगावकर, वंदना हांडे, दिशा घोसावी, प्रशिक्षिका अनिता उलवेकर व निर्मला जाधव आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.               

Post Bottom Ad