म्हाडाची 4.31 कोटींची थकबाकीदारांकडून वसुली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडाची 4.31 कोटींची थकबाकीदारांकडून वसुली

Share This
मुंबई http://www.jpnnews.in 
म्हाडाच्या मुंबई मंडळाने महिनाभरात पूर्व आणि पश्‍चिम उपनगरातील वसाहतींमधून चार कोटी 31 लाखांची थकबाकी वसूल केली. आणखी महिनाभरात त्यात काही कोटींची भर पडेल. वर्षानुवर्षे पैसे न भरणाऱ्या म्हाडाच्या वसाहतींमधील थकबाकीदारांना आठवण करून देण्यासाठी अधिकाऱ्यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. 

1 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यात आठ हजारांहून अधिक रहिवाशांना नोटिसा पाठवल्या आहेत. थकबाकीचे पैसे कमी आणि व्याज जास्त असल्याने ते पैसे भरण्यास उत्सुक नसतात. तरीही या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात महिनाभरात चार कोटी 31 लाखांची वसुली झाली. 2015-16 या आर्थिक वर्षात 11 कोटी 95 लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 66 कोटी 17 लाख वसूल झाले आहेत. या मोहिमेत अनेकांना पुढील महिन्यापर्यंत मुदत दिली असल्याने आणखी वसुली अपेक्षित आहे. आतापर्यंत सरासरी 60 ते 65 टक्के वसुली झाली आहे. या मोहिमेत बोरिवली 77 टक्के, घाटकोपर 78 आणि वांद्रे पूर्व 77 टक्के वसुली झाल्याने या वसाहती आघाडीवर आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages