फाऊंटन परिसरात ट्रामच्या सेवेचे अवशेष सापडले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फाऊंटन परिसरात ट्रामच्या सेवेचे अवशेष सापडले

Share This
मुंबई http://www.jpnnews.in 
शहरातील रस्त्यावर फाऊंटन परिसरात ट्रामच्या सेवेचे अवशेष सापडले आहेत. विकासाच्या वेगाबरोबर मागे पडलेले ट्रामचे ट्रॅक पाहण्यासाठी मुंबईकरांनीही आज फोर्ट परिसरात मोठी गर्दी केली. ट्रामच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे ज्येष्ठांच्या आठवणींना उजाळा दिला, तर लहानग्यांमध्ये ट्रामच्या ट्रॅकबद्दल कुतूहल दिसत होते. 

रविवारच्या निमित्ताने दक्षिण मुंबईत एरवी पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्यांची गर्दी आज राहून राहून फोर्ट परिसरात हॉल्ट घेत होती. निमित्त होते ते ट्रामचे ट्रॅक पाहण्याचे. महापालिकेने केलेल्या खोदकामात अवघ्या काही फुटांवर ट्रॅमच्या ट्रॅकचे अस्तित्व सापडले. ट्राम जंक्‍शनच्या ठिकाणी "मॅन्युअली‘ बदलण्यात येणाऱ्या ट्रामचा रॉड पाहण्यासाठीही गर्दी झाली होती. अगदी ट्रामच्या ट्रॅकवर उभे राहून फोटो क्‍लिक करण्यापासून ते सेल्फीचाही आनंद मुंबईकर आणि पर्यटकांनी घेतला. ट्रॅकच्या शेजारीच चावी लावून क्रॉसिंगचा रॉड बदलण्यासाठीचा बॉक्‍स पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये कुतूहल होते. एलेन कंपनीच्या ट्रामच्या ट्रॅकचा फोटोही अनेकांनी आवर्जून क्‍लिक केला. घोड्याच्या ट्रामपासून ते आजच्या बेस्टच्या व्होल्वो बसेसपर्यंतचा अनुभवही काही जणांनी ट्रामच्या ट्रॅकच्या निमित्ताने ताजा केला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages