सफाई क्षेत्रातील ठेकेदारी पद्धत बंद करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सफाई क्षेत्रातील ठेकेदारी पद्धत बंद करा

Share This
भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची मागणी 
मुंबई http://www.jpnnews.in 
स्वच्छ भारतची देशभर मोठी मोहीम राबवली जात आहे, त्याचवेळी महाराष्ट्र सरकार मात्र सफाई क्षेत्रात ठेकेदारी पद्धत आणून  या क्षेत्रातील नोकऱ्या काढून घेत आहे, असा आरोप करत सफाई कामांमधील ठेकेदारी पद्धत बंद करा, अन्यथा मुंबईतील सफाई कर्मचारी दिल्लीच्या धर्तीवर उग्र आंदोलन करतील असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी िदला.

मुंबईतील परळ येथे रविवारी सफाई कामगारांचा भव्य मेळावा पार पडला. सफाई कामांच्या अतिआवश्यक सेवेमध्ये ठेकेदारी पद्धत बंद करावी, माथाडी बोर्डच्या धर्तीवर सफाई कामगारांचे महामंडळ बनवावे, अनुसूचित दलित सफाई कामगारांना आरक्षणातून आरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या मजदुर काँग्रेसच्या वतीने यावेळी करण्यात आल्या.

मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्े अध्यक्ष शरद पवार येणार होते. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे पवार उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहीर यांची मेळाव्यास मुख्य उपस्थिती होती. सफाई कामगारांची हेळसांड करुन सरकारला स्मार्ट सिटी उभारण्यात कदापी यश येणार नाही, असा दावा माजी आमदार अहीर यांनी केला. सफाई कर्मचाऱी नियुक्तीबाबत चुकीचा जीआर काढून देवेंद्र फडणवीस सरकारने फसवणूक केली आहे. त्याबाबत त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसीटी दाखल केली पाहिजे, अशी मागणी संघाचे अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी आपल्या भाषणात केली. 

सफाई क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मावजीभाई मारु, बीरमसीह कीर, भगवानभाई सोलंकी, भीमजी परमार, राहा दाठिया आिण जीवराज राठोड या कामगारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages