पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
MUMBAI http://www.jpnnews.in दि. 22 Feb 2016
आरटीई कायदा धाब्यावर बसवत पालिका शाळासाठी मिळणारे कमी क्षेत्रफळाच्या वर्ग खोल्या घेतल्या प्रकरणी शिक्षण विभागातील दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावड़े यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकड़े केली आहे.
महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागातील सेकंड ओक्टोबर शालेचा ओमकार बिल्डरच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात आला होता. बिल्डरने आरटीई शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे 360 चौरस फुटाच्या 9 वर्ग खोल्या पालिकेच्या शिक्षण विभागाला द्यायला हव्या होत्या. परंतू पालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासकिय अधिकारी वंदना गोसावी यांनी बिल्डरधार्जिणा निर्णय घेवून कमी क्षेत्रफ़ळाच्या वर्गखोल्या बिल्डरकडून ताब्यात घेतल्या. यामुले 10 महिन्यात या शाळेतील 80 टक्के विद्यार्थी पटसंख्या कमी झाली आहे.
या संदर्भात एस आर ए च्या कार्यकारी अभियंते भिसे यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित केली असता भिसे यांनी प्रशासकिय अधिकारी वंदना गोसावी याना जबाबदार धरले आहे. आरटीइ निकषात या वर्ग खोल्या बसतच नव्हत्या तर या वर्ग खोल्या त्यांनी स्वीकारलीच का अशी विचारना केली होती. ओमकार बिल्डरचे हित जपण्याचे काम वंदना गोसावी यांनी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गोसावी या प्रकरणी दोषी असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांनी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकडे केली आहे.

No comments:
Post a Comment