हार्बरवर शुक्रवारपासून 12 डबा लोकल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हार्बरवर शुक्रवारपासून 12 डबा लोकल

Share This
मुंबई - मध्य रेल्वे मार्गावर पहिली 12 डबा लोकल शुक्रवारपासून (ता. 29) धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी बुधवारी (ता. 27) पत्रकार परिषदेत दिली. 

सध्या या मार्गावर केवळ एक गाडी चालवण्यात येईल आणि तिच्या दिवसभरात 14 फेऱ्या होतील, असे ओझा यांनी सांगितले. वाशी स्थानकातून शुक्रवारी सकाळी 6 वाजता 12 डब्यांची पहिली लोकल सुटेल आणि वडाळा रोड स्थानकात ती 6.30 वाजता पोचेल. शेवटची 12 डबा लोकल सीएसटी ते वाशीदरम्यान धावेल. ती रात्री 10 वाजून 58 मिनिटांनी सीएसटीहून सुटेल. ही गाडी रात्री शेवटच्या फेरीनंतर सानपाडा कारशेडमध्ये स्टॅबलिंग लाईनवर थांबवण्यात येईल. सीएसटी ते पनवेल दरम्यान 12 डबा लोकलच्या आठ फेऱ्या चालवण्यात येतील, असे ओझा यांनी सांगितले. हार्बरवर सर्व गाड्या 12 डब्यांच्या झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासी क्षमता 33 टक्‍क्‍यांनी वाढेल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल, असा दावाही ओझा यांनी केला आहे. 

12 डबा गाडीच्या फेऱ्या 
वाशी (6.00) ते वडाळा रोड (6.30) 
वडाळा रोड (6.42) ते पनवेल (7.42) 
पनवेल (7.56) ते वडाळा रोड (8.55) 
वडाळा रोड (9.07) ते वाशी (9.36) 
वाशी (9.43) ते सीएसटी (10.31) 
सीएसटी (10.35) ते पनवेल (11.53) 
पनवेल (12.06) ते सीएसटी (1.24) 
सीएसटी (1.28) ते पनवेल (2.46) 
पनवेल (2.57) ते सीएसटी (4.16) 
सीएसटी (4.23) ते पनवेल (5.41) 
पनवेल (5.58) ते सीएसटी (7.16) 
सीएसटी (7.20) ते पनवेल (8.38) 
पनवेल (8.47) ते सीएसटी (10.05) 
सीएसटी (10.10) ते वाशी (10.58)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages