महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त आयएएस पदाला कलंक - शिशिर शिंदे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त आयएएस पदाला कलंक - शिशिर शिंदे

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त महापालिकेची कार्यालये बंगले इत्यादी सुविधा वापरत असले पालिकेकडून पगार घेत असले तरी पालिकेशी प्रतारणा करत असल्याने असे अधिकारी आयएएस पदाला कलंक आहेत असा आरोप मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.


भांडुप पश्चिमेला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी महानगरपालिकेचा भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. या ठिकाणी 550 खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल बनणार होते. परंतू या ठिकाणी रूनवाल बिल्डरचे काम सुरु असल्याने जानेवारी 2013 पासून रुग्णालयाचे काम रखडवले गेले. या ठिकाणी जवळच नर्सिंग क्वार्टर्स आणि डॉक्टरांसाठी निवासस्थान उभारली जाणार होती. परंतू रूनवाल बिल्डरचे काम पूर्ण व्हावे म्हणून रुग्णालय, नर्सिंग क्वार्टर्स आणि डॉक्टरांसाठी निवासस्थानाचे काम करण्यात आलेले नाही. यामागे देशमुखी करण्यात पाटाईत असलेला अधिकारी असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

या ठिकाणी रुग्णालय बनले असते तर मुंबई उपनगरातील लोकांबरोबर ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथील लोकांनाही याचा फायदा झाला असता. परंतू बिल्डरांशी इमानदारी राखणाऱ्या अधिकाऱ्यामुले रुग्णालय उभे राहिलेले नाही. न्यायालयातही पालिकेने योग्य बाजू न मांडल्याने या भूखंडा पैकी काही भूखंड बिल्डरला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत असे शिंदे यांनी सांगितले आहे.

रस्ते घोटाळ्या प्रकरणी अधिकारी अभियंते दोषी आहेत मग रस्ते विभाग ज्यांच्या अखत्यारीत येतो त्या आयएएस अधिकारी असलेल्या श्रीनिवासन यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे. श्रीनिवास नगरसेवकांचाही अपमान केल्याचे शिंदे यांनी सांगितले. आयएएस अधिकारी पालिकेने दिलेल्या मोठ्या घरात राहतात , आणि पालिकेशी बेईमानी करतात यामुळे आयुक्तानी संजय देशमुख व श्रीनिवासन या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages