डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पालिकेत 233 बाटल्या रक्तदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पालिकेत 233 बाटल्या रक्तदान

Share This
मुंबई / प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ‘ऋणानुबंध अभियान’ द्वारे सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. दोन दिवस चाललेल्या या रक्तदान शिबिरात 233 रक्तदात्यानी सहभाग नोंदवला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकीचे कार्य करण्यासाठी ऋणानुबंध अभियानाची स्थापना केली आहे. ऋणानुबंध अभियानाद्वारे महापालिकेच्या इंजिनिअरींग हब, वरळी येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात 127 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर महापालिका मुख्यालय, सीएसटी येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात 106 अश्या एकूण 233 रक्तदात्यानी रक्तदान केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान करून पालिका कर्मचारी आणि अधिकारी यांनी आगळी वेगळी मानवंदना दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages