तीन वर्षात बालविवाहाचे ६७० गुन्हे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तीन वर्षात बालविवाहाचे ६७० गुन्हे

Share This
नवी दिल्ली- वर्ष २०१२ ते २०१४ या तीन वर्षाच्या कालावधीत सुमारे ६७० बालविवाहाच्या गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली.

नॅशनल क्राईम रॅकार्ड ब्युरोने दिलेल्या आकडेवारीनुसार बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार तीन वर्षात अनुक्रमे १६९, २२२ आणि २८० अशा गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. सरकार बालविवाहाच्या समस्येवर काम करत असून त्यावर येत्या काळात आश्वासक पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने बालविवाह कायदा २००६ची कडक अंमलबजावणी करून बालविवाहसारख्या गुन्ह्यांना आळा घालावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बालविवाह रोखण्यासंबंधी मुद्रित आणि इलेक्ट्रानिक माध्यमातून जाहिराती तसेच जनजागृती करण्यावर भर देण्याचे आश्वासनही गांधी यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages