रस्ते घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रस्ते घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल

Share This
  • मुंबई : मुंबई महानगरपालिकेने रस्ते घोटाळ्यात अडकलेल्या सहा कंत्राटदारांविरोधात बुधवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आर. के. मधानी, रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्टस लिमि., महावीर रोड इन्फ्रास्ट्रक्टर प्रा. लि., जे. कुमार, के. आर. कन्स्ट्रक्शन आणि आर.पी.एस. यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सहा जणांविरोधात फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि गुन्हेगारी कट रचणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
  • अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी खड्डेमुक्त मुंबईसाठी साडेसात हजार कोटी रुपयांचा रस्त्यांचा मास्टर प्लॅन तयार केला होता. मात्र या कामामध्ये अनियमितता आढळून येताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी तो रद्द करत या कामाच्या चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे अहवालात म्हटले होते. तानुसार मुंबईच्या आझाद मैदान पोलिस ठाण्यात १२०(बी), १९७, ४२० या कलमान्वये (१६६/२०१६) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages