मुंबई / प्रतिनिधी - देवनार डंपिंगच्या आगीनंतर डंपिंग शेजारी असलेल्या कचरा वेचकांवर कारवाई करण्यात येत आहे. पालिकेने या कचरा वेचकांची ओळखपत्र रद्द केली असून त्याना डंपिंगमधे प्रवेशबंदी केली आहे. यामुले गेले महिनाभर या कचरा वेचकांच्या कुटुंबीयांची उपासमार होत असल्याने कचरा वेचकांना डंपिंगमधे प्रवेश देवून त्यांना आपले पोट भरू द्यावे अशी मागणी खासदार आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकड़े केली.
सचिन तेंडुलकर यांच्या सासु अनाबेला मेहता यांची अपनालय नावाची संस्था असून ही संस्था कचरावेचक लोकांसाठी काम करत आहे. अपनालय या संस्थेने देवनार डंपिंगला लागनार्या आगीबाबत जगातील उत्कृष्ट अश्या त्रिमय या पर्यावरणासाठी काम करणार्या संस्थेशी संपर्क साधला होता. या संस्थेने देवनारमधे जाऊन सर्वेक्षण केले. या दरम्यान आयआयटी आणि निरी या संस्थेशी संपर्क साधुन एक रिपोर्ट त्रिमय संस्थेने बनवला आहे. त्याबाबतचे एक सादरीकरण पालिकेच्या एम पूर्व विभागात करण्यात आले. यावेळी सचिन तेंडुलकर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता उपस्थित होते.
देवनारच्या बाबत त्रिमय कंपनीने बनवलेल्या रिपोर्टचे सादरीकरण करताना सुका आणि ओला कचरा गोला करण्यासाठी वेगवेगल्या गाड्या वापरण्याचा, ओला आणि सुका कचर्यासाठी गाड्याना वेगला रंग देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यावेळी सचिनने अपनालय संस्थेची मुले कचरा वेचक आहेत. त्यांच्यावर कारवाई होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून या मुलांवर कारवाई करू नए या मुलाना कचरा वेचू द्यावा आणि डंपिंग बंद करावे अशी मागणी सचिनने केली.
यावर देवनार डंपिंग ग्राउंड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारकड़े पाठवला आहे. यामुले कचरावेचकाना डंपिंगमधे सोडता येवू शकत नसल्याचे स्पष्ट केले. याच वेळी सचीन हां स्वच्छ भारत अभियानाचा ब्रांड एंबेसेटर आहे त्याच प्रमाणे पालिकेसाठीही सचिनने कचर्याची समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करावे अशी आयुक्तानी मागणी केली. यावर सचिनने नागरीकाना ओला अणि सुखा कचारा वर्गीकरण करण्याचा संदेश देण्यासाठी पालिकेला हवे तेव्हा सहकार्य करण्याचे तसेच संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे.


No comments:
Post a Comment