अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला गँगरीन; कापावा लागणार पाय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला गँगरीन; कापावा लागणार पाय

Share This
कराची, दि. २५ - १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर अनेक गुन्ह्यांसाठी भारताला हवा असलेला अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याला आपला पाय गमवावा लागणार आहे. पायाला गँगरीन झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून, गँगरीन पासून वाचण्यासाठी पाय कापणे हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर असल्याचे वृत्त आहे.

प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांनूसार दाऊदच्या पायाचे गँगरीन अगदी शेवटच्या टोकाला पोहोचले आहे. त्यामूळे दाऊदचा जीव वाचवायचा असेल तर, पाय कापणे हे इतकेच आमच्या हाती असल्याचे दाऊदच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, दाऊदवर सध्या कराचीच्या लिकायत नॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची सुत्रांची माहिती आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages