पाणी शुद्धीकरण कंपन्यांमध्ये आणीबाणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाणी शुद्धीकरण कंपन्यांमध्ये आणीबाणी

Share This
मुंबई - महापालिकेच्या कारवाईविरोधात पाण्याच्या टॅंकरचालकांनी पुकारलेल्या संपाचा फटका आता पाणी शुद्धीकरण करणाऱ्या शहरातील 55 कंपन्यांना बसणार आहे. शुक्रवारपासून या कंपन्यांचा पाणीपुरवठा थांबवण्यात आल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर परिणाम होणार आहे. 

टॅंकरमाफियांच्या विरोधात पालिकेने सुरू केलेल्या कारवाईविरोधात पाणी टॅंकर असोसिएशनने संप पुकारला आहे. तरीसुद्धा पाणी शुद्धीकरण करणाऱ्या कंपन्यांना टॅंकरमार्फत पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. परंतु, शुक्रवारी (ता. 29) संध्याकाळपासून या कंपन्यांना होणारा पाणीपुरवठाही बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. शहर व उपनगरामध्ये पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया राबवून, त्याची विक्री करणारे 55 कारखाने आहेत. पालिकेने मार्चपासून केलेल्या पाणीकपातीचा फटका या कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे टॅंकरमार्फत बोअरवेल व विहिरीच्या पाण्यावर प्रक्रिया करून, त्याची विक्री केली जात होती. हे पाणी रुग्णालये, व्यावसायिक संकुले, लग्न-समारंभ, तसेच मागणीनुसार घरीही पोहचवले जाते. आता शुक्रवारपासून पाणी बंद झाल्याने कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. पाणीच नसेल, तर आम्हाला उत्पादन करता येणार नाही आणि त्याचा परिणाम आमच्या सेवेवर होईल, असे ग्रेटर मुंबई पॅकेज ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील जैन यांनी सांगितले. याबाबत टॅंकर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी पाणीच मिळत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages