कोरियन कंपन्यांना महाराष्ट्र शासन सहकार्य करेल - उद्योगमंत्री सुभाष देसाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोरियन कंपन्यांना महाराष्ट्र शासन सहकार्य करेल - उद्योगमंत्री सुभाष देसाई

Share This
मुंबई, दि. 22 : भविष्यातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाढती मागणी पाहता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक करणा-या कोरियन कंपन्यांना महाराष्ट्र शासन उचित सहकार्य करेल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मंत्रालयात उद्योगमंत्री देसाई यांची भारतातील कोरियाचे महावाणिज्यदूत सुनगुईन कीम यांनी भेट घेतली. त्यावेळी देसाई बोलत होते.
राज्यात अनेक विदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली असूनभविष्यात अनेक नवउद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. भारत 2030 पर्यंत सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक्स उपकरण निर्यात करणारा देश ठरेल. त्यासाठी उद्योगांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्याची शासनाची तयारी असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स बरोबरच कौशल्य विकास आणि वस्त्रोद्योगातही गुंतवणूक करण्याबाबत कोरिया सकारात्मक आहे, असे कीम यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages