मुंबई / प्रतिनिधी - पैशाची बर्बादी कशी होते याचे ज्वलंत उदाहरण बीकेसीत बनविलेली नवीन बेस्टची स्वतंत्र लेन आहे. या लेनवर 6.50 कोटी खर्च करुन बनविलेला सायकल ट्रैक आहे ज्याचा आजपर्यंत कधीच वापर झाला नाही. आता त्याच सायकल ट्रैकवर एमएमआरडीएने पुनश्च 1.24 कोटी रुपये खर्च करुन बेस्ट बससाठी नवीन लेन बनविली आहे.
बीकेसीत वित्तीय संकुलासोबत कुर्ला आणि बांद्रास जोडणारा एक लिंक रोड आहे. या संकुलात निवासी वस्ती नसताना सुद्धा एमएमआरडीए कोणताही अभ्यास न करता 6.50 कोटी खर्च करत सायकल ट्रैक बनविला ज्याचा वापर गेल्या 5 वर्षात कधीच झाला नाही. याबाबीस आरटीआय मार्फत बाहेर काढताच आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री आणि प्रशासनिक अधिकारीवर्गाकडे तक्रार केली परंतु पैश्याची बर्बादी करणा-या अधिकारी वर्गावर कोणतीही कारवाई झाली नाही.
नुकतेच एमएमआरडीएने 1.24 कोटी खर्च करत याच सायकल ट्रैकवर बेस्ट बससाठी नवीन स्वतंत्र लाइन बनविली आहे आणि सायकल ट्रैकच्या प्रकरणास बंद केले आहे. अनिल गलगली जे या ट्रैकच्या दुदर्शेला आणि पैश्यांच्या बर्बादीसाठी जबाबदार असलेल्या अधिकारी वर्गावर कारवाई होण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांच्या मते कोणताही अभ्यास न करता योजना कार्यान्वित केल्याच्या दुष्परिणाम सायकल टैक आहे. बीकेसीत अश्या कोणत्याही मार्गाची आवश्यकता नव्हती ना आता बेस्टसाठी नवीन स्वतंत्र बस लेनची. यापेक्षा कुर्ला आणि बांद्रास रेल्वे ने जोडणे अधिक सोयीस्कर ठरेल.


No comments:
Post a Comment