मुंबई, दि. २९ : मुंबईच्या विकास प्रक्रियेला गती देणारे तसेच त्याच्या वैभवात भर टाकूशकतील असे पायाभूत सुविधा निर्मितीचे विविध प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतले आहेत.यात प्रामुख्याने कोस्टल रोड निर्मिती, वर्सोवा – वांद्रे सी लिंक, मेट्रो रेल्वेच्या नवीन मार्गांचीनिर्मिती, इलेव्हेटेड मेट्रो, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रोजेक्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ,भेंडी बाजार पुनर्विकास अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांची मुंबईसाठीअसलेली आवश्यकता पाहता त्यांच्या कामांना गती देण्यात यावी. भूसंपादन, पुनर्वसन, विविधविभागांच्या मंजुऱ्या, निधीची उपलब्धता आदींची पूर्तता करुन मुंबईच्या विकासालागतीदेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले
पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या वॉर रुमशी संबंधितविविध प्रकल्पांची आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली, त्यावेळीते बोलत होते. यावेळी खासदार पूनम महाजन, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी सर्वश्री सुनिल पोरवाल, नितीन करीर, मनुकुमार श्रीवास्तव, मिलिंद म्हैसकर, व्ही. गिरीराज, डॉ. आशिषकुमार सिंह, भूषण गगराणी,श्रीकांत सिंह, यू. पी. एस. मदान, अश्विनी भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावाघेतला. ते म्हणाले की, मुंबईतील वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेलाकोस्टल रोडचा प्रकल्प विशेष प्राधान्याने गतिमान करण्यात यावा. वर्सोवा-वांद्रे सी लिंक हाप्रकल्पही अत्यंत महत्त्वाचा असून याला विविध परवानग्या मिळाल्या आहेत. कोस्टल रोडआणि वर्सोवा-वांद्रे सी लिंक या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दक्षिण मुंबईतून वर्सोव्या पर्यंतचे मोठे अंतर फार कमी वेळात पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या दोन प्रकल्पांना विशेष प्राधान्याने गती देण्यात यावी. या प्रकल्पांच्या निर्मितीसाठी निधीची अडचण येणार नाही.विविध माध्यमांतून यासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करण्यात येईल, असे ते म्हणाले.
कुलाबा–वांद्रे–सीप्झ ही मेट्रो लाईन क्रमांक ३ तसेच दहिसर–डीएन नगर व दहिसर–अंधेरी (पूर्व) या इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्पांसंदर्भातही याप्रसंगी चर्चा झाली. मेट्रो लाईन क्रमांक ३साठी विविध परवानग्या मिळविणे, भूसंपादन इत्यादी काम गतिमान झाले आहे. हे निश्चितचउल्लेखनीय असून मुंबईकरांना आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनेमेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे लवकरात लवकर सुरु करणे आवश्यक आहेत, असे ते म्हणाले. मुंबई आणि पनवेलमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करु शकणाऱ्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचे काम आता लवकरच सुरु करता येऊ शकेल या टप्प्यावर आहे. नवी मुंबईविमानतळाचे कामही लवकरच सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनायाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
याप्रसंगी वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग, अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग तसेच वर्धा-गडचिरोली रेल्वे मार्ग या प्रकल्पांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. या सर्व प्रकल्पांसाठीआवश्यक असलेले भूसंपादन, पुनर्वसन व इतर अनुषंगिक कामांची पूर्तता करुन याप्रकल्पांचे काम लवकर सुरु होईल यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशीसंपर्क साधून प्रकल्पाचे काम तातडीने सुरु करण्याच्या दृष्टीने भूसंपादन इत्यादी कामेगतिमान करण्यात यावीत, असे निर्देश दिले.
आधार कार्ड तसेच ई-सार्वजनिक वितरण व्यवस्थेचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, लाभार्थ्यांना पुरेशा अन्नधान्याचापुरवठा होणे यादृष्टीने ही व्यवस्था ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अन्नआणि नागरी पुरवठा विभागाने हे काम तातडीने पूर्ण करुन सार्वजनिक वितरण व्यवस्थाऑनलाईन करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


No comments:
Post a Comment