कॉर्पोरेट जगताने राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी मदत करावी - राज्यपाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॉर्पोरेट जगताने राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी मदत करावी - राज्यपाल

Share This
मुंबई, दि. 22 : कॉर्पोरेट जगताने मराठवाड्यातील दुष्काळग्रतांना मदतीचा हात देण्याबरोवबरच राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी मदत करावी असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन 2016 साठी निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रियप्रोकॅम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंगस्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनचा ब्रँड अॅम्बॅसिडर जॉन अब्राहम आदी उपस्थित होते.


राज्यपाल म्हणाले कीस्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनने 13 वर्षांत निधी संकलनाचे उत्तम कार्य केले आहे. कॉर्पोरेट जगताने दानाची संस्कृती जपताना राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी मदत करावी. यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनसाठी सर्वाधिक निधी संकलन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्टॅंडर्ड चार्टर्ड, टीसीएस तसेच मुंबई मॅरेथॉनचे इतर प्रायोजक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages