ओला आणि सुखा कचरा वेगळा न केल्यास कचरा उचला जाणार नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ओला आणि सुखा कचरा वेगळा न केल्यास कचरा उचला जाणार नाही

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना ओला आणि सुखा कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले होते. परंतू महापालिकेकड़ेच ओला आणि सुखा कचरा वेगले करण्यासाठी गाड्या नसल्याने कचाऱ्याचे वर्गीकरण केले जात नव्हते. कचऱ्याचे वर्गीकरण योग्य प्रकारे करता यावे म्हणून महापालिका 410 नवे टेम्पो घेणार आहे.


मुंबई महानगरपालिकेकडून कचर्याचे वर्गीकरण करण्यासाठी योजना जाहिर केल्यावर नागरीकानी सुका आणि ओला कचरा वेगला करण्यास सुरुवात केली. असा वर्गीकृत केलेला कचरा पालिकेकड़े सुका आणि ओला कचरा नेण्यासाठी वेगळ्या गाड्या नसल्याने एकाच गाडीत पुन्हा कचरा एकत्र वाहून नेला जात होता. पालिकेच्या 24 विभागात सध्या 37 टेम्पो सुका कचरा वाहून नेण्यासाठी असले तरी हे टेम्पो फोन करून सोसायटीमधे बोलवले तरच येत असल्याने ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यात अडचणी येत आहेत.

याबाबत सातत्याने टिकेची झोड़ उठल्यावर आता पालिका सुका आणि ओला कचरा वेगवेगळा वाहून नेण्यासाठी 410 टेम्पो नव्याने घेणार आहे. 410 पैकी 200 टेम्पोचे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा न केल्यास संबंधित अधिकार्याना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्या सोसायटीना आधी नोटिस देण्यात येइल त्या नंतरही कचरा वेगळा न केल्यास संबंधित सोसायटीचा कचरा उचला जाणार नाही अशी माहिती पालिका सूत्रांकडून मिळाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages