विरोधकांच्या आक्रमकतेमुळे रस्ते घोटा्याचा अहवाल नगरसेवकांना मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विरोधकांच्या आक्रमकतेमुळे रस्ते घोटा्याचा अहवाल नगरसेवकांना मिळणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधील रस्ते घोटाल्याचा अहवाल नगरसेवकांना स्थायी समितीला सादर न करताच महापौरानी मिडीयाला अहवाल दिल्याने नगरसेवकांना अहवाल का दिला नाही असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षानी आक्रमक होत स्थायी समितीत गोंधळ घातला. विरोधक आक्रमक झाल्याने रस्ते घोटाळ्याचा अहवाल नगरसेवकांना देण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांना द्यावे लागले आहेत.

महापालिकेत रस्ते घोटाळा गाजत आहे. रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी खुद्द महापौर स्नेहल आंबेकर यांनी केल्यावर आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आयुक्तानी महापौरांकड़े सादर केल्यावर महापौरानी पत्रकार परिषद घेवून अहवालाची माहिती पत्रकारांना दिली होती. रस्ते घोटाळयाचा अहवाल स्थायी समितीला, गट नेत्यांना किंवा नगरसेवकांना देण्यात आला नव्हता. हा नगरसेवकांचा अवमान आहे. आयुक्तांनी महापौरानी हा अहवाल सभागृह किंवा स्थायी समितीत सादर होण्यापुर्वीच पत्रकारांना दिल्याने विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी स्थायी समितीत प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्याना कोंडीत पकडले. विरोधी पक्षातील स्थायी समिती सदस्यांना बोलायला दया नाहीतर झटपट सभा तहकुब करा अशी मागणी छेडा यांनी केली.

अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी महापौरांच्या मागणी नुसार चौकशी केली जात असली तरी सभागृहात अहवाल सादर केला जाईल की नाही याची माहिती नाही. स्थायी समितीत अहवाल पुढच्या बैठकीत सादर केला जाईल असे सांगितले. यावर कोंग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, मनसेच्या सदस्यांनी स्थायी समितीला अहवाल आताच सादर क़रा अशी मागणी करत गोंधळ घातला. विरोधक रस्ते घोटाळ्यावर आक्रमक झाल्याचे पाहून स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी गटनेत्याना व स्थायी समिती सदस्यांना अहवाल देण्यात यावा असे निर्देश प्रशासनाला दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages