"करून दाखविले" नाही तर "विकून दाखविले" - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"करून दाखविले" नाही तर "विकून दाखविले"

Share This
"रस्त्यांमधील भ्रष्टाचाराबाबत माफी मागून सत्ताधारायनी राजिनामा द्यावा"
शिवसेना-भा.ज.पा नी केलेला भ्रष्टचार घरोघरी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार
मुंबई / प्रतिनिधी (२९ एप्रिल)- मुंबई:"करून दाखवले' असे सांगत मुंबईतील रस्ते खडड्ेमुक्त करण्याच्या घोषणा करणाऱ्या शिवसेना व भा. ज.पा सरकार चे सर्व भ्रष्टाचार उघड झाले असून रस्त्यांच्या निकृष्ट कामाची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. तसेच निकृष्ट रस्त्यांच्या कामाची नैतिक जबाबदारी स्विकारत सत्ताधार्यांनी राजिनामा द्यावा, असेही अहिर म्हणाले. मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईतील निकृष्ट रस्त्यांबाबत महापौरांनी सादर केलेल्या अहवालाच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.


नालेसफाई आणि मुंबईच्या कचऱ्याच्या प्रश्नांत महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजपचा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर आता रस्त्यांच्या कामातही मोठा भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली आहे. मुंबईतील बहुतांश रस्त्यांच्या बांधकामात सरासरी ५३ टक्के अनियमितता असून महापालिका आयुक्तांनी तपासणी केलेल्या ३४ रस्त्यांपैकी सर्वच्या सर्व रस्त्यांचे काम हे निकृष्ट झाल्याचा अहवाल आयुक्तांनी नुकताच महापौरांना सादर केला आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत आम्ही करत असलेल्या आरोपांवर या अहवालामुळे शिक्कामोर्तब झाले असून आता या अहवालाच्या आधारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अहिर यांनी केली आहे.

तसेच रस्त्यांची संपुर्ण कामे आपल्या मर्जीतील ठेकेदारांना देऊन त्याबदल्यात सत्ताधारी कोट्यवधी रुपये उकळत असल्याचा आरोप करत अहिर यांनी सर्वच रस्त्यांच्या निविदा प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली. रस्ते बांधणीचे प्रस्ताव कसे मंजूर होतात, कामाच्या देखरेखेची जबाबदारी कुणाची याचा खुलासा होण्याची गरज व्यक्त करत मा. अहिर पुढे म्हणाले की, या सर्व प्रकरणाची जबाबदारी फक्त प्रशासनावर ढकलून सत्ताधाऱ्यांना नामानिराळे राहता येणार नाही. या शिवाय याच रस्त्यांच्या कामावर काही दिवसांपुर्वी उद्धव ठाकरे समाधान व्यक्त करत होते, असा उल्लेख करत अहिर म्हणाले की, रस्त्यांबाबतच्या या अहवालामुळे उद्धव ठाकरेंचे दावेही फोल ठरले आहेत.

सत्ताधाऱ्यांमधील वाद म्हणजे पब्लिसीटी स्टंट – मा. सचिन अहिर
सध्या मुंबई महापालिकांच्या विविध कामांचे श्रेय मिळवण्यासाठी सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ लागली अाहे. तसेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याचा प्रकारही पुढे येत असल्याचे सांगत मा. अहिर म्हणाले की, असे वाद झडले म्हणजे वृत्तपत्र आणि प्रसिद्धी माध्यमांमधून दोघांनाही प्रसिद्धी मिळते. तसेच हा प्रकार म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चर्चेत राहण्यासाठी शिवसेना आणि भाजपने रचलेला पुर्वनियोजित बनाव असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages