भाजपा खोट्या बातम्या पसरवत असल्याचा मनसेचा आरोप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपा खोट्या बातम्या पसरवत असल्याचा मनसेचा आरोप

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्या समोर ठेवून भाजपा पूर्णपणे बिथरली आहे. यामुलेच मनसेचे नगरसेवक आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या खोट्या बातम्या पसरवून संभ्रम पसरवीत आहे. भाजपाकडून असा संभ्रम पसरवून मनसेला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप मनसेचे जेष्ठ नगरसेवक आणि उपाध्यक्ष दिलीप लांडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 


गेले काही दिवस काही विशिष्ट वृत्तपत्रातून मनसेचे काही नगरसेवक फुटणार असल्याच्या, भाजपाने मनसेच्या काही नगरसेवकांना आपल्या फंडातुन निधी दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याबाबत खुलासा करताना मनसेच्या दोन नगरसेविकावर पक्ष विरोधी कारवाया केल्या प्रकरणी कारवाई झाली आहे. इतर सर्व नगरसेवक मनसेसोबत आहेत.

मनसेच्या नगरसेवकाना 95 लाखाचा निधी मिळाला. हा निधी पालिका सभागृहात ठराव मंजूर करून देण्यात आला आहे. यापैकी मला फ़क्त 5 लाख रुपयांचा निधी मिळाला असताना 5 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोप धादांत खोटा आहे. महापालिकेत पक्षाला निधी मिळतो जर भाजपाचे गटनेते मनोज कोटक त्यांना मिळालेला निधी मनसेच्या नगरसेवकांना दिला सांगत असतील तर असा निधी मिळण्यासाठी किती मनसेच्या नगरसेवकांनी त्यांच्याकड़े पत्र दिली ती जाहिर करावी असे आवाहन लांडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages