राज्य निवडणूक आयोगाच्या ‘निवडणूक वार्ता’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्य निवडणूक आयोगाच्या ‘निवडणूक वार्ता’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन

Share This
मुंबईदि. 25: प्रत्येक तरुण- तरुणीस अठराव्या वाढदिवसानंतर लगेच मतदार ओळखपत्र भेट देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवीअशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केली.

राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेल्या निवडणूक वार्ताच्या पहिल्या अंकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झालेत्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारियाआयोगाचे सचिव डॉ. प्रदीप व्यासराज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी,उपसचिव परिमल सिंह आदी यावेळी उपस्थित होते.
            
मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी युवा वर्गाला अठराव्या वाढदिवसानंतर ओळखपत्र भटे देण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य ठरू शकतोअसे सांगून राज्यपाल म्हणाले कीस्वातंत्र्यानंतर आणि 73 व 74 व्या घटना दुरुस्तीनंतर लोकशाहीला बळकटी आली असली तरी आपल्या लोकशाहीला फार मोठी परंपरा आहे. ही परंपरा जपण्याकरिता अधिकाधिक लोकांनी मतदान करणे आवश्यक आहे.
            
सहारिया म्हणाले कीमतदार यादी तयार करण्याचे काम भारत निवडणूक आयोगाच्या वतीने केले जाते. तीच यादी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय तयार केली जातेपरंतु मतदार नोंदणी वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविली जाते.
            
आयोगाचे उपसचिव धनंजय कानेडअवर सचिव नितीन वागळेसहायक आयुक्त सूर्यकृष्णमूर्तीजनसंपर्क अधिकारी जगदीश मोरेतहसीलदार आरती सरवदेकक्ष अधिकारी अतुल जाधवतसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आदी यावेळी उपस्थित होते. 

निवडणूक वार्ता’ देशात प्रथमच
राज्य निवडणूक आयोगातर्फे निवडणूक वार्ताच्या स्वरुपात न्यूज लेटर’ प्रकाशित करण्याचा हा प्रयोग देशभरात पहिल्यांदाच आपल्या राज्यात होत असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. या अंकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील घटनाघडामोडीनिवडणूक कार्यक्रम आदींचा समावेश असेल. श्री. सहारिया यांची ही संकल्पना असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दर सहा महिन्यांनी हा अंक प्रकाशित केला जाणार आहे. आयोगाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास मुख्य संपादक असून आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे कार्यकारी संपादक आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages