डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात तज्ज्ञांच्या सूचना विचारात घेणार – राजकुमार बडोले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात तज्ज्ञांच्या सूचना विचारात घेणार – राजकुमार बडोले

Share This
मुंबई, दि. 27 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक साकारण्यासाठी समाजातील विविध तज्ज्ञांचे विचार आणि सूचना मागविण्यात येत आहेत, असे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज सांगितले.


आज मंत्रालयात इंदू मिलच्या जागेवरील डॉ. आंबेडकर स्मारकासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बडोले बोलत होते. बैठकीस विधानपरिषद सदस्य जोगेंद्र कवाडे,अविनाश महातेकरमहेंद्र साळवेबृहन्मुंबई नगरविकासचे उपसंचालक संजय बाणाईतडॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेवास्तुविशारद अतुल प्रभू आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक हे तज्ज्ञांच्या सहमतीने आणि त्यांच्या सूचना घेऊनच तयार करण्यात येईलया स्मारकात समानतेचे प्रतीक असलेला डॉ. आंबेडकर यांचा भव्य पुतळाभव्य ग्रंथालयवास्तुसंग्रहालयडॉ. आंबेडकर यांच्या जीवनाचा प्रवास उलगडणारे शिल्पचित्र अशा विविध सूचनांची दखल घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages