डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजउत्थान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजउत्थान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Share This
मुंबईदि. 28 : समाज कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजउत्थान पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 29 एप्रिलपर्यंत हे अर्ज पाठविण्याचे आवाहन सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांनी केले आहे.
अनुसुचित जातीविमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्या कल्याणासाठी तसेच अपंगकुष्ठरोगी यांच्यासाठी कार्य करणाऱ्या 125 समाजसेवकांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजउत्थान पुरस्कार’ देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (तीन प्रतीत)कामांची वृत्तपत्रीय कात्रणेप्रशस्तीपत्रकेपोलीसांचा दाखला या माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव तीन प्रतीत पाठवावेत. या पुरस्कारासाठीचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त,समाज कल्याणमुंबई शहर व उपनगर यांचे कार्यालयप्रशासकीय इमारत,भाग-1चौथा मजलाआर.सी. मार्ग. चेंबूरमुंबई-400071 या पत्त्यावर तीन प्रतीत द्यावेअसे आवाहन सहायक आयुक्तांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages