मुंबई - टाटा पॉवरच्या हक्काच्या अशा घरगुती वीज ग्राहकांना प्रस्तावित दरवाढीमुळे घाम फुटणार आहे. दुसरी कंपनी सोडून आलेल्या (चेंजओव्हर) ग्राहकांना मात्र सुगीचे दिवस आणणारे वीजदर प्रस्तावित केलेले आहेत.
2016-17 पासून 2017-18 पर्यंत बहुवार्षिक दरवाढीचा प्रस्ताव कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. टाटा पॉवरने दारिद्य्ररेषेखालील ग्राहकांसाठी सर्वाधिक 80 टक्के; तर शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना 71 टक्के दरवाढ सुचवली आहे. घरगुती ग्राहकांना वाढीव वीजदर; तर वाणिज्यिक आणि उच्चदाब वीज ग्राहकांसाठी वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव टाटा पॉवरने मांडला आहे. मोठ्या प्रमाणावर महसूल देणाऱ्या जाहिराती आणि फलकांच्या वीजजोडणीसाठी, उच्चदाब आणि औद्योगिक ग्राहकांसाठी कोणतीही दरवाढ प्रस्तावित नाही.

दुसऱ्या कंपनीचा वीजपुरवठा बंद करून टाटाकडे आलेले (चेंजओव्हर) ग्राहक टाटाकडेच राहतील, याची काळजी प्रस्तावात घेण्यात आली आहे. घरगुती ग्राहक वगळता इतर कोणत्याही ग्राहकांना दरवाढ सुचवलेली नाही. सहा लाख ग्राहकांत थेट ग्राहकांचे प्रमाण अवघे 10 टक्के असल्याचा टाटा पॉवरचा दावा आहे. 24 मे रोजी टाटा पॉवरच्या वीजदर प्रस्तावावर "वर्ल्ड ट्रेड सेंटर‘मध्ये जनसुनावणी होणार आहे.

No comments:
Post a Comment