देशभरात दूरसंचारची ग्राहकसंख्या मंदावली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देशभरात दूरसंचारची ग्राहकसंख्या मंदावली

Share This
मुंबई - देशभरात दूरसंचार ग्राहकांच्या संख्येत एक टक्‍क्‍याहून कमी वाढ झाली आहे; तर लॅण्डलाईन ग्राहकांमध्ये सातत्याने घट होत असल्याची माहिती दूरसंचार नियामक आयोगाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. जानेवारीअखेरीस 104 कोटी 32 लाख ग्राहकांची संख्या फेब्रुवारीमध्ये 105 कोटी 18 लाख इतकीच झाली. वायरलेस ग्राहकांमध्ये अवघ्या 0.85 टक्‍क्‍याची वाढ झाली आहे; तर लॅण्डलाईन ग्राहकांमध्ये 2.52 कोटी ग्राहकांची घट झाली आहे. तसेच ब्रॉडबॅण्डचे ग्राहक 14 कोटींनी वाढले आहेत. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी फेब्रुवारी महिन्यात "ट्राय‘कडे 51 लाख अर्ज आले होते. ही सुविधा सुरू झाल्यापासून या वर्षाच्या जानेवारीपर्यंत 19 कोटी 96 लाख अर्ज आले होते; तर फेब्रुवारीपर्यंत या अर्जांची संख्या 20 कोटी 47 लाख होती. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages