मुंबई - लोकलच्या टपावर चढून जीव धोक्यात घालणाऱ्या स्टंटबाजांची तक्रार आता व्हॉट्सऍपवर करता येणार आहे. तसेच जे कोणी हुल्लडबाज स्टंट करतील अशांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवल्यास अशांवर 24 तासांत कारवाई होणार आहे. तसेच रेल्वेच्या 182 या हेल्पलाइनवरही तक्रार करता येणार आहे.
हार्बरप्रमाणे पश्चिम रेल्वेतही स्टंटबाज हे रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांसमोरची डोके दुखीचा विषय असतो. अशा स्टंटबाजांवर दोन्ही यंत्रणा कारवाई करत असतात. "सकाळ‘ या स्टंटबाजांबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे. पश्चिम रेल्वेवर स्टंटबाजी रोखण्याकरिता विशेष पथक नेमण्यात आले आहे. कोणी जीव घेणे स्टंट करत असल्यास त्याची तक्रार 90044 99718 या क्रमांकावर करता येणार आहे. तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.


No comments:
Post a Comment