मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाची कामे पार पाडण्यासाठी विधी तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील 10 मान्यवरांचे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. विधी व न्याय विभागाने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणासाठी नामनिर्देशित सदस्य पुढीलप्रमाणे :
मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ समुपदेशी आर. ए. दादा, वरिष्ठ अधिवक्ता राजीव पाटील, मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सेंटर फॉर सोशोलिगल स्टडीज ॲन्ड ह्युमन राइट्स शाखेचे अध्यक्ष डॉ. आशा बाजपेयी, सेंटर फॉर क्रिमिनॉलॉजी ॲन्ड जस्टिसचे डॉ. के. पी. आशा मुकुंदन, चंद्रपूर येथील अधिवक्ता व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती विजया बांगडे, मुंबई येथील अधिवक्ता श्रीमती जयश्री अकोलकर, नागपूर येथील अधिवक्ता प्रशांत कुमार साथीनाथन, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सदाशिव एस. देशमुख, अधिवक्ता, एस. जी. देशमुख, अधिवक्ता श्रीमती शुभांगी देशमुख-बर्वे. या दहा मान्यवरांना महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे, अशी माहिती विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व विधी परामर्शी एन. जे. जमादार यांनी दिली आहे. या सदस्यांचे नामनिर्देशन ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरिता राहील, असेही त्यांनी सांगितले

No comments:
Post a Comment