मुंबईत पाच महिन्यांत 21 दात्यांचे अवयवदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत पाच महिन्यांत 21 दात्यांचे अवयवदान

Share This
मुंबई - अवयव प्रत्यारोपणाबाबत मुंबईत योग्य दिशेने जनजागृती होत आहे. येथे जानेवारी ते 10 मे 2016 पर्यंत 21 दात्यांचे अवयवदान करण्यात आले. जानेवारी ते 10 मे 2016 पर्यंत मुंबईत 11 हृदयांचे प्रत्यारोपण झाले. त्यापैकी चार हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अल्पवयीन रुग्णांवर करण्यात आल्या. 
ऑगस्ट 2015 पासून हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना वेग आला. नऊ महिन्यांत मुंबईत 16 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या. जानेवारी 2016 पासून सुमारे 21 जणांवर यकृत; तर 37 जणांवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या. यात सुरत आणि पुण्यातून हृदय आणण्यासाठी ग्रीन कॉरिडोर करण्यात आले. 


सोमवारी (ता. 9) 31 वर्षांच्या पुरुषाच्या शरीरात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्याचे यकृत आणि दोन्ही किडन्या दान केल्या. यामुळे तीन पुरुषांना नवजीवन मिळाले. ग्लोबल रुग्णालयात 58 वर्षांच्या पुरुषाला यकृत बसवण्यात आले. एक किडनी हिंदुजा रुग्णालयातील 26 वर्षांच्या तरुणाला आणि दुसरी जसलोक रुग्णालयातील 30 वर्षांच्या पुरुषाला बसवण्यात आली. 

18 मिनिटांत 133.52 किलोमीटर 
16 वर्षांच्या मुलीवर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. सातारा येथील 46 वर्षीय महिलेचा रस्त्यावरील अपघातानंतर मेंदू मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. पुण्यातील रुबी रुग्णालयात या महिलेच्या कुटुंबीयांनी यकृत, किडनी, हृदय आणि दृष्टिपटल दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अवघ्या 18 मिनिटांत हृदय 133.52 किलोमीटर पार करून मुलुंडमधील फोर्टीस रुग्णालयात आणण्यात आले. गुजरातमधील अंकलेश्‍वरमध्ये राहणाऱ्या 16 वर्षांच्या मुलीला हृदय बसवण्यात आले. त्यानंतर मुंबईतील हृदय प्रत्यारोपणाच्या यादीत 16 रुग्णांची नोंद झाली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages